आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीटाकळी नगरपंचायत; 94 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या बार्शीटाकळीसाठी ९४ उमेदवार रिंगणात आहेत. वैध-अवैध नामांकनाच्या छाननी नंतरची ही स्थिती असून बुधवार, २ जुलै रोजी अंतिम स्थिती स्पष्ट होईल.

 

दोन जुलै हा उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त ११, नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या ८३ उमेदवारांपैकी किती जण कायम राहतात, हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आगामी १५ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जुलैला मतमोजणीअंती निकाल जाहीर केला जाईल. बार्शीटाकळीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण संवर्गाचे आहे. त्यामुळे कोणत्याही जाती-धर्माचा पुरुष किंवा महिला ही निवडणूक लढू शकते. त्यामुळेच राजकीय पक्षांसह अपक्षांनीही कंबर कसली असून तब्बल ११ अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय १७ नगरसेवकांसाठी ८३ अर्ज भरण्यात आले असून यापैकी खऱ्या उमेदवारांची संख्या २ जुलैला स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...