आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास द्याल तर बंदोबस्त करु; भाजप लोकप्रतिनिधींचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- खरीप हंगामातील पीक कर्ज वितरण संथ गतीने हाेत असल्याने मंगळवारी भाजप लाेकप्रतिनिधींनी अाक्रमक पवित्रा घेत थेट राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये धाव घेतली. लाेकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत शेतकऱ्यांना कर्ज देताना बँका त्रास देत असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसही बॅंकांमध्ये तैनात हाेते. त्यानंतर भाजप नेत्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित दाेषी बॅक अधिकाऱ्यांविराेधात कारवाईसाठी तक्रार दिली. बँकांवर यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सत्ताधारी असलेल्या भाजप नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, काय हे पाहणे अाैत्सुक्याचे राहणार अाहे. 


यंदा १ जूनपासूनच पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याकरिता शेतकऱ्यांची लगबग वाढली. शासनानेही पीक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वितरण प्रक्रियेला सुरुवात केली .प्रशासनानेही ही प्रक्रिया गतिमान हाेण्यासाठी प्रयत्न केले. कर्ज वितरण प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट बॅंकांकडून पूर्ण व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित बॅंक अधिकाऱ्यांना निर्देशही दिले. मात्र अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी निर्माण करीत अाहेत. काही ठिकाणी कर्ज देण्याबाबत टाळाटाळ सुरु अाहे. 


...तर थेट अांदाेलन
कर्ज वितरणप्रकरणी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय कार्यालय व भारतीय स्टेट बँकेत धाव घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. संथ गतीने कर्ज वितरण करुन शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला. दरवर्षी शासनाकडून कर्जासाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र काही अधिकाऱ्यांमुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण हाेत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भाजप सरकारविरुद्ध असंतोष निर्माण हाेताे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला. काही बँक अधिकारी कागदपत्र असतानासुद्धा शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत अाहेत. याकडे जिल्हा प्रशासन, अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे; अन्यथा अधिकाऱ्यांच्याच विराेधात अांदाेलन केले जाईल, असा इशारा नेत्यांनी दिला. 


पोलिसात दिली तक्रार
कर्ज वितरण संथ गतीने हाेत असल्याने भाजप नेत्यांनी बँकेतून थेट सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला धाव घेतली. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने १,३२८ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मात्र तरीही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली अाहे. 


या बंॅक अधिकाऱ्यांशी केली चर्चा
पीक कर्ज वितरणाच्या मुद्द्यावर भाजपने महाराष्ट्र बँक स्टेट बँक, भारतीय स्टेट बॅंक, बँक सेंट्रल बँक आदी बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. तातडीने कर्जाचे टारगेट पूर्ण करण्याची सूचना लाेकप्रतिनिधींनी केली. याप्रसंगी भाजपचे नेते पंचायत समितीचे उपसभापती गणेश अंधारे, दिनकर गावंडे, जयंत मसने, गणेश कंडारकर, प्रवीण हगवणे, विवेक भरणे. डॉ. अमित कावरे, अनिल मुरूमकार, दिलीप मिश्रा, विजय परमार , रमेश शिरसाट, शेख रहिम, विशाल पाटील अादी उपस्थित हाेते. 


गुन्हा दाखल करण्याचा इशारा
शेतकऱ्यांना कर्ज वितरण प्रक्रियेत अनावश्यक दस्तावेजांची मागणी करु नये, असा अादेश जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांनी काही दिवसांपूर्वी दिला हाेता. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा अग्रणी बंॅक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि सर्व बॅंक समन्वयकांना पाठवले हाेते. याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास, त्यात तथ्य आढळल्यास बँकेच्या व्यवस्थापकांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्ट केले हाेते. मात्र बंॅका म्हणावे त्या गतीने कर्ज वितरण प्रक्रिया राबवत नसल्याचे दिसून असल्याचे , राज्य व केंद्रात सत्ता असूनही भाजप लाेकप्रतिनिधींनी घेतलेल्या अाक्रमक पावित्र्यानिमित्ताने दिसून येत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...