आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिपीसीवर मनपाचे तर झेडपीचे सदस्य; नगरपालिकांच्या तीन नवीन सदस्यांची झाली निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी)१४ जागांचे निकाल शनिवारी सकाळी मतमोजणीअंती घोषित झाले. त्यानुसार मनपाचे सात, जि.प.चे चार नगरपालिकांचे तीन नवे सदस्य विजयी झाले. यापैकी निम्मे सदस्य बिनविरोध निवडून आले.इतर सात जणांचा निकाल मतमोजणीनंतर घोषित झाला. 


थेट निवडणुकीतून विजयी झालेल्यांमध्ये जि.प.च्या सरलाबाई मेश्राम (गुडधी, प्राप्त मते ३१), नगरपालिकेचे राजेश खारोडे (तेल्हारा, प्राप्त मते ६२) गंगा चंदन (अकोट, प्राप्त मते ६१), मनपाचे विजय अग्रवाल (अकोला, प्राप्त मते ३६), शितल गायकवाड (अकोला, प्राप्त मते २८), शारदा ढोरे (अकोला, प्राप्त मते २८) आणि राजेंद्र गिरी (अकोला, प्राप्त मते २७) यांचा समावेश आहे. 


या सात पदांसाठी नगरपालिकेचे सात, मनपाचे सहा आणि जिल्हा परिषदेचे दोन असे १५ जण मैदानात होते. त्यामुळे विजयी सात सदस्य वगळता इतर आठ जणांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत उमेदवारांमध्ये अकोट नगरपालिकेच्या रेशमा अंजुम अफजलखाँ, बाळापूरचे मुशीरुल हक अमीरुल हक नासीर हुसेन सफदर हुसेन, तेल्हाऱ्याचे मितेश मल्ल सुनीता भुजबले, जिल्हा परिषदेचे महादेव गवळे तसेच मनपाच्या शाहीनान्जुम मेहबूब आणि मंगेश काळे यांचा समावेश आहे. 


प्रारंभी सकाळी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणीला प्रारंभ झाला. इव्हीएम नसल्यामुळे ही निवडणूक मतपत्रांद्वारे घेण्यात आली. मतदारांना पसंतीक्रमाचा पर्याय देण्यात आल्याने एकल संक्रमण पद्धतीने कोटा निश्चित करुन ती पुढे नेली गेली. मुळात विजयी सर्व उमेदवारांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मोजलीच गेली नाही. 


२२७ सदस्यांनी केले होते मतदान 
जिल्ह्यातील पाचही न.प.चे ११८, मनपाचे ८० आणि जि.प.चे ५२ अशा २५० सदस्यापैकी शुक्रवारी मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत (सायंकाळी वाजेपर्यंत) मनपा संपूर्ण ८०, जि.प.च्या ३१ तर न.प.च्या ११६ सदस्यांनी (९०.८० टक्के) मतदान केले होते. 


अकरा मते अवैध 
निवडणुकीत मतदान कसे करावे, याची माहिती सर्व सदस्यांना आधीच देण्यात आली होती. मराठी किंवा इंग्रजी लिपीतील एक आणि दोन या अंकाचा वापर करावा, असा यासाठीचा पर्याय होता. तरीही काहींनी एक हा अंक दोनदा तर काहींनी तो वापरता थेट दोन हा अंक लिहला. त्यामुळे ११ मते अवैध ठरली. यामध्ये मनपा जिल्हा परिषदेचे एक आणि नगरपालिकांच्या नऊ मतांचा समावेश आहे. 
- नरेंद्र टापरे, निवडणूकनिर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...