आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: 1 लाख 91 हजारांपैकी 97 हजार 318 शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - शेतकरी कर्जमाफी प्रारंभ कार्यक्रमाला सध्या १०८ दिवस उलटल्यानंतरही अातापर्यंत १ लाख ९१ हजार १८७ पात्र लाभार्थ्यांपैकी ९७ हजार ३१८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून कर्जमाफीची रक्कम ४०६ काेटी ३४ लाखापर्यंत पाेहाेचली अाहे. सहकार मंत्र्यांनी शुक्रवारी अकाेला जिल्हयातील वंचित राहिलेल्या ५६ हजार शेतकऱ्यांना संधी देण्यात येईल, या केलेल्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी हाेईल, असा सवाल कर्जमाफी योजनेच्या सध्याची अंमलबजावणीची गती लक्षात घेता उपस्थित हाेत अाहे. जिल्हयातील कर्जमाफीसाठी ७२४ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली अाहे.

 

राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अाॅनलाईन पद्धतीने अर्ज केले हाेते. अाॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना काही दस्तावेज सादर करणे बंधनकारक करण्यात अाले हाेेते. जेणेकरून पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ हाेईल. मात्र अनेकदा कनेक्टिव्ही नसल्याने शेतकऱ्यांना रात्रभर सेतू केंद्रावर थांबावे लागत हाेते. लाभार्थी निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही कर्जमाफी साठी पात्र असलेल्या ५६ शेतकऱ्यांचा १८ अाॅक्टाेबर राेजी सपत्नीक प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला हाेता.

 

का हाेताेय विलंब :
१) सरकारने काेणतीही तयारी करण्यापूर्वीच कर्जमाफीची याेजना राबवल्याचा अाराेप शेतकरी नेते व विराेधकांकडून करण्यात अाला हाेता. पॅन नंबर, अाधार कार्ड क्रमांक, सात-बारासह इतरही दस्तावेजांची पडताळणी झाल्यानंतर अर्जाचा पात्र यादीत समावेश करण्यात येत अाहे.
२) सर्व अर्ज शासनाच्या एका माेठ्या सर्व्हेवर अपलाेड करण्यात येत अाहेत. या अर्जदार शेतकऱ्यांनी अाणखी काेणत्या बॅंकेकडून कर्ज घेतले काय, शेतकऱ्यास अाणखी काेणत्या स्त्राेतांकडून अार्थिक लाभ हाेत अाहे, हे तपासण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या संगणकीय पडताळणीमध्ये तांत्रिक अडचणीही येत अाहे.

 

अधिकाऱ्यांनाही मदतीची नाही शाश्वती
जिल्ह्यातील ४१२ सेवा सहकारी संस्थांच्या एकूण १ लाख १२ हजार ४०६ लाभार्थी व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँका यांचे एकूण ७८ हजार ७८१ लाभार्थी असे एकूण १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी पात्र ठरले अाहेत. मात्र ९३ हजार ८६९ शेतकरी केव्हा कर्जमुक्त हाेतील, हे कोणत्याच शासकीय यंत्रणेचे अधिकारी सांगू शकत नाही.

 

पडताळणी नंतरच हाेते खात्यात रक्कम जमा
शेतकऱ्यांनी सादर केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करण्यात येत अाहे. तफावत, त्रृटी असल्यास त्या दूर करीत आहोत. यादीची पडताळणीनंतर आणि तसे शासनाने कळवल्यानंतर पैसे जमा हाेत अाहेत.
- गाेपाल मावळे, जिल्हा उपनिबंधक.

बातम्या आणखी आहेत...