Home | Maharashtra | Vidarva | Akola | news about farmers of akola

पीक कर्ज 25 टक्के, पेरणी मात्र 90 टक्के; शेतकरी सावकारांच्या दारात

प्रतिनिधी | Update - Jul 29, 2018, 12:32 PM IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, लालफितशाहीमुळे यंदा अातापर्यंत २५ टक्के खरीपासाठी पीक कर्ज वितरीत केले अाहे.

 • news about farmers of akola

  अकाेला - राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, लालफितशाहीमुळे यंदा अातापर्यंत २५ टक्के खरीपासाठी पीक कर्ज वितरीत केले अाहे. जिल्ह्यात ९० टक्के पेरणी झाली. वितरीत कर्ज व झालेली पेरणी लक्षात घेता पैशांसाठी शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ अाली, असे तज्ज्ञांचे मत अाहे. यंदा पीक कर्जाचे १३४३ काेटींचे उद्दिष्ट असून, अातापर्यंत ३१६ काेटी २७ लाखाचे कर्ज वितरीत झाले.


  खरीप हंगामात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली होती. जिल्ह्यात पाऊस सुरु अाहे. शासनानेही पीक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वितरण प्रक्रियेला सुरुवात केली. प्रशासनानेही ही प्रक्रिया गतिमानतेसाठी प्रयत्न केले. कर्ज वितरण प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट बॅंकांकडून पूर्ण व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँक अधिकाऱ्यांना निर्देशही दिाले. मात्र अनेक बँका कर्ज देण्यासाठी अडचणी निर्माण करीत अाहेत. काही ठिकाणी कर्ज देण्याबाबत टाळाटाळ सुरु अाहे.

  असे झाले कर्ज वितरीत : जिल्ह्यात ३९ हजार २२६ शेतकऱ्यांना कर्ज वितरीत केले. यात जिल्हा बँकेने १९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १४७काेटी ९० लाख (उद्दिष्ट अाहे ६५० काेटी ९० लाख), राष्ट्रीयकृत बँकांनी १५ हजार ६९३ शेतकऱ्यांना १२९ काेटी ९९ लाख(उद्दिष्ट अाहे. ५७७ काेटी ७८ लाख), खासगी बँकांनी १ हजार ३५९ शेतकऱ्यांना १९ काेटी ४७ लाख ग्रामीण बँकेने २ हजार ५७८ शेतकऱ्यांना १९६ काेटी ९१ लाखाचे कर्ज वितरीत केले.

  ...त्यामुळे वंचित : थकबाकीदार शेतकरी कर्जापासून वंचित असल्याचे कर्ज वितरणातील घसरणीच्या कारणांचा शाेध घेतल्यानंतर समाेर अाले. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत कर्ज घेतलेले शेतकरी थकबाकीदार अाहेत. त्यांनी कर्जफेड न केल्याने ते पात्र हाेऊ शकले नाहीत, असेही तज्ज्ञांचे मत अाहे. एका बॅंकेची ही थकबाकीदाराची संख्या ६३ हजार अाहे. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी दिली असती तर कर्ज वितरणाचे चित्र वेगळे असते, असे तज्ज्ञांचे मत अाहे.

  जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले हाेते आदेश : पीक कर्ज वितरण प्रक्रियेबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांनी बँक व जिल्हा उपनिबंधकांना पत्र जारी केले हाेते. शेतकऱ्यांना कर्ज वितरण प्रक्रियेत अनावश्यक दस्तावेजांची मागणी करु नये, असा अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी िदला हाेता. याचे पत्र त्यांनी अग्रणी बँक अधिकारी, उपनिबंधक, मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व बँक समन्वयकांना पाठवले हाेते. मात्र या पत्रानेे कर्ज वितरण प्रक्रियेची फलनिष्पत्ती काय, हे अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.

  अशी झाली पेरणी
  जिल्ह्यात कृषी विभागाच्या लेखी ८६ टक्के पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात ही टक्केवारी ९० टक्क्यापेक्षा जास्त अाहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे पेरणी झाली अाहे.


  पावसात मूर्तिजापूर तालुका अव्वल : जिल्ह्यात अातापर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ६५६ मि.मी. पाऊस पडल्याची नाेंद शनिवारी प्रशासनाने केली. १ जून ते २८ जुलै या कालावधीत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे एकूण पाऊस झाला. सरासरी पाऊस ६५.५७ टक्के पडला अाहे.

Trending