आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हागणदारी मुक्त गाव; उघड्यावर बसणाऱ्यांना आता व्हिडिओ शूटींगचे भय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गावाची निर्मळता कायम राखण्यासाठी गुड मार्निंग पथकाने व्हिडिओ शूटींगचा धाक दाखवावा, असे निर्देश जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीने दिले. समाज कल्याण समितीच्या सभापती रेखाताई अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जलव्यवस्थापन समितीची सभा पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गेल्या सभेचे कार्यवृत्त मंजूर करताना जि.प. सदस्या सरलाताई मेश्राम यांनी हा विषय उपस्थित केला. त्याला अनुसरुन इतरांनीही चर्चेच भाग घेतला. अंतिमत: पीठासीन सभापतींनी व्हिडिओ शूटींगचा धाक दाखविण्याचा पर्याय अंमलात आणावा, असे निर्देश दिले. मेश्राम यांच्या मतदारसंघातील बहुतेक गावे शासनाने हागणदारी मुक्त केले आहेत. परंतु तरीही नागरिक उघड्यावर शौच करुन घाण पसरवतात. त्यामुळे गावचे स्वास्थ्य बिघडते, असे त्यांचे म्हणणे होते. हे थांबविण्यासाठी सर्वांनी शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. चर्चेदरम्यान पातूर तालुक्यातील तुलंगा (बु.) व शिर्ला येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कूपनलिकांची बांधणी आणि सावरगाव येथील बंधाऱ्याचे स्थानिक स्तर विभागाला हस्तांतरण या विषयांवरही चर्चा करण्यात आली. 


विभागीय आयुक्तांच्या पातूर दौऱ्यामुळे जि.प. अध्यक्ष संध्याताई वाघोडे आजच्या सभेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळेच सभेचे अध्यक्षपद अंभोरे यांच्याकडे सोपविण्यात आले. 


सभेला शिक्षण व अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती देवकाबाई पातोंड, जि.प. सदस्य अनिता आखरे, श्रीकांत खोने, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. वाठ आदी मान्यवर उपस्थित होते. 


गावात स्वच्छता कायम राखण्यासाठी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने घेतला निर्णय, सरला मेश्राम यांनी वेधले होते लक्ष जिल्हा परिषदेमधील जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित पीठासीन सभापती रेखाताई अंभोरे व इतर पदाधिकारी. दानापूरला गढूळ पाण्याचा पुरवठा दानापूर गावात चार कूपनलिका आहेत. त्यापैकी एका कूपनलिकेतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची संबंधित सदस्याची तक्रार होती. या बाबीची दखल घेत त्या कूपनलिकेची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...