आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर हल्ला; पती,सासऱ्याला शिक्षा , जुने शहरात २०१३ मध्ये घडली होती घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला -  विवाहितेवर हल्ला केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली. ही घटना जुने शहरात घडली हाेती. गीता वीरेंद्र वाकोडे यांनी १८ अाॅगस्ट २०१३ राेजी जुने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली हाेती. त्यानुसार त्यांचे लग्न वीरेंद्र रामभाऊ वाकोडे यांच्याशी झाले हाेते. मात्र काही दिवसांनी त्यांच्या वाद झाले. नंतर हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रापर्यंत पाेहाेचले. केंद्रात चर्चेनंतर प्रकरण मिटले हाेते. त्यानंतर त्या अाई व भावासाेबत घरी जात असताना वीरेंद्र वाकोडे, सासरे रामभाऊ वाकोडे यांनी वाद घातला. त्यांच्या अाईवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. याचवेळी त्याही जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दाेन्ही अाराेपींविरुद्ध कलम २९४, ३२३,५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला. पोलिसांनी तपास करुन दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले. 

या खटल्याची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायाधीश श्वेता चांडक यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने अाराेपींनी कलम २९४ व ३२३ अन्वये दाेन-दाेन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादीकडून अॅड. प्रकाश वखरे आणि अॅड. बीरपाॅल यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सरकारकडून अॅड. इंगाेले यांनी युक्तिवाद केला. 

बातम्या आणखी आहेत...