आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीचे नव्या वर्षात हजार रुपये कमी दराने ‘स्वागत’; किमान दर केवळ 4000 रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- बाजारात हमीभावापेक्षा तब्बल सरासरी हजार रुपये कमी दराने खरेदी करून नवीन तुरीचे ‘स्वागत’ सुरू झाले आहे. तुरीचे हमीभाव ५०५० रुपये असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सोमवारी कमाल ४३५०, तर किमान ४००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मागील वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेले खरेदी केंद्र या वर्षी हंगाम सुरू होऊनही सुरू झाल्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या हातावरच ‘तुरी’ पडण्यास सुरुवात झाली आहे. 


जिल्ह्यात या वर्षी खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन पावसाअभावी, तर कपाशी बोंड अळीने भुईसपाट झाली आहे. संत्रा गळतीमुळे कोट्यवधींची हानी शेतकऱ्यांना सोसावी लागली आहे. चार प्रमुख पिके हातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची दारोमदार खरिपातील तुरीवर टिकून होती. परंतु तुरीवरूनही दवाळ गेल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. मागील वर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन बाजारात होणारी लूट गृहीत धरून शासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच डिसेंबर २०१६ मध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यामुळे बाजारात किमान ३५०० रुपये क्विंटलने होणाऱ्या खरेदीच्या लुटीला काही प्रमाणात आळा बसला होता. दोन आठवड्यापासून बाजारात नवीन तूर विक्रीला येण्यास सुरुवात झाली आहे. खुल्या बाजारात तुरीला सरासरी ४००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. 


गतवर्षी डिसेंबरमध्येच खरेदी 
मागीलवर्षी खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने डिसेंबरमध्येच तूर खरेदी सुरू केली होती. शासनाच्या कणखर भूमिकेमुळे या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाला होता. परंतु या वर्षी हंगाम सुरू होऊनही तुरीची शासकीय खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातावर बाजारात तुरीच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


नोटिफिकेशन नाही 
तूर खरेदीबाबत अद्यापपर्यंत शासनाचे कोणतेही नोटिफिकेशन आलेले नाही. 
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक. 

बातम्या आणखी आहेत...