आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्थायी'ची सभा: भाजपचे नगरसेवक म्हणाले, पथदिव्यांची दुरुस्ती कागदावरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवरून शनिवारी मनपा स्थायी समितीच्या सत्ताधारी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत देखभाल कागदावर अाहे, असा अाराेप केला. वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या निविदेवर नगरसेवकांनी तीव्र अाक्षेप घेतल्याने हा विषय तूर्तास अमान्य करीत जुन्याच पद्धतीने (कंत्राटदाराकडून) देखभालीचा निर्णय घेतला. यावर सभेत विराेधक, सत्ताधारी सदस्यांत घमासान झाले. नगसेवकांच्या घरीच लाइट अाहे, असा अाराेप कांॅग्रेस नगरसेवकाने केला. यावर भाजप सदस्यांनी तीव्र अाक्षेप घेत कांॅग्रेसच्या त्या नगरसेवकाने सभागृहाची क्षमा मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे काही वेळ सभागृहात गाेंधळ झाला हाेता.

 

स्थायी समिती सभेत शिवसेना सदस्या मंजूषा शेळके यांनी प्रभाग क्रं. १०मध्ये काही घरांत खड्डे पडत असल्याचे सांगितले. यावर नगर सचिव अनिल बिडवे यांनी अधिकाऱ्यांना पाहणीची सूचना केली. त्यानंतर पथदिव्यांची वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा दरास मंजुरीवर चर्चा झाली. कांॅग्रेसचे नगरसेवक माे. इरफान यांनी यापूर्वी झालेल्या देखभालीची माहिती मागितली. यावर भाजपचे नगरसेवक क्षीरसागर यांनी देखभाल कागदावरच असल्याचे सांगत हिंदू स्मशान भूमीतील दिवे बंद असल्याचे सांगितले. वायरचे पैसेही नगरसेवकांकडे मागतात, असे भारिप-बमसंच्या सदस्या धनश्री देव म्हणाल्या. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवून इतर विषयांवर चर्चा केली. कांॅग्रेसचे नगरसेवक माे. इरफान यांनी लाइट नगरसेवकांच्या घरी अाहे, असा अाराेप करीत यावर मनपाचा खर्च कशासाठी असा सवाल केला. याला भाजपचे बाळ टाले यांनी अाक्षेप घेत हे लाइट घरी नसून तुम्ही क्षमा मागा, अशी मागणी केली.


महिला नगरसेवकांनीही अामच्या घरी लाइट नसल्याचे सांगताच टाले यांनी क्षमा मागण्याचा मुद्दा रेटला. नंतरच्या चर्चेत माे. इरफान यांनी घरी लाइट असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी घरी म्हणजेच प्रभागात लाइट अाहेत, असे म्हणत सारवासारव केली. त्यामुळे टालेंनी लाइट नगरसेवकाच्या घरी कसे, असा सवाल करीत एफअायअार नोंदवण्याची मागणी केली. भाजप सदस्य विनाेद मापारींनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. अभियंत्यांनीही लाइट हद्द वाढ झालेल्या प्रभागात लावल्याचे सांगितले. सभेनंतर माे इरफान यांनी हे लाइट नगरसेवकांच्या घरी अाहेत काय, ते कुठे अाहेत, असे सवाल केल्याचा दावा पत्रकारांशी बाेलताना केला. पथदिव्यांचा विषय संबंधित कंपनीकडे का हस्तांतरित केला नाही, असा सवाल भाजप सदस्य विनाेद मापारी यांनी केला. अधिकाऱ्यांच्या चालढकल, देवाण-घेवाणच्या मानसिकतेनेे देखभाल दुरुस्तीवर जादा खर्चाची वेळ येते, असे मापारी म्हणाले. सबमर्सिबल पंप बसवण्यावर चर्चा झाली. पाण्याबाबतची कामे बंद असल्याचे सदस्या मंजूषा शेळके म्हणाल्या. गळती काढण्यात येत नसल्याचे टाले म्हणाले. यावर अभियंत्यांनी कंत्रादारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावर नागरिकांना पाणी मिळाले नाही, अपव्यय झाला, याची भरपाई कशी करणार , असा सवाल टाले यांनी केला.

 

अधिकाऱ्यांची हाेणार वेतन कपात
स्थायी समिती सभेला अर्धा तास विलंबाने हजर झाल्याने सभा सुरु होण्यास वेळ लागला. अधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभेची वेळ साडेअकरा असताना पावणे बारापर्यंत अधिकारी आले नाही. मात्र सदस्य उपस्थित होते. यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना सभागृहात घेतल्यास सभेवर बहिष्कार घालू, असा इशारा सदस्यांनी दिला. पावणे बारा नंतर अधिकारी येऊ लागले. त्यामुळे सभापतींनी दार बंद करण्याची सूचना केली. अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवून उशिरा आलेल्यांचे एक दिवस वेतन कपातीची सूचना सभापतींनी केली.

 

अतिवृष्टीने पथदिवे बंद; तातडीने करा सुरु
जूनच्या पहिल्या आठवड्यातील वादळी वारा- अतिवृष्टीनेे अनेक भागातील दिवे बंद अाहेत. त्यामुळे सर्वे केला काय, असा प्रश्न सदस्य बाळ टाले यांनी केला. यावर विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी अाकडेवारी वाचण्यास प्रारंभ करताच सदस्यांनी ही माहिती मनपात बसूनच तयार केल्याचे सांगितले. पावसाळा सुुरु असल्याने रस्त्यावर अंधार असणे हे घातक अाहे. त्यामुळे तीन दिवसात दिवे सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी किती खर्च येईल, त्यानुसार कशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी लागेल , हे समाेर येणार असून, एवढ्या कमी दिवसात हे शक्य नसल्याचे सांगितले. यावर टाले यांनी दीड काेटीचे कामे तुकड्यांत कशी केली, असा सवाल उपस्थित करीत दिवे सुरु करण्याची मागणी केली. यावर सभापती विशाल इंगळे यांनी अधिकाऱ्यांना पथदिवे सुरु करा, अशी सूचना केली. या चर्चेत सदस्य अनिल गरड यांनीही सहभाग घेतला.

 

बातम्या आणखी आहेत...