आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषय शिक्षकांची ज्येष्ठता यादी; समुपदेशन पद्धतीने पद स्थापना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीप्रक्रिये घाेळाबाबत मंगळवारी प्रशासन आणि शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीमध्ये जि.प.मध्ये बैठक झाली. विषय शिक्षक नियुक्तीबाबत तत्काळ माहिती संकलित करुन सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार अाहे. त्यानंतर समुपदेशन पद्धतीने पदस्थापनेचा निर्णय घेण्यात अाले. १ जुलै राेजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी १ जुलै रोजी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यानुसार मंगळवारी प्रशासनाने बैठक घेऊन समन्वय समितीशी चर्चा केली. 


शासनाने यंदा शिक्षकांची ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पाडण्याचा निर्णय घेतला हाेता. शिक्षकांना शाळा निवडण्यासाठी काही पर्यायही देण्यात अाले हाेते. मात्र बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा अाराेप शिक्षकांमधून झाला आणि याविरोधात लढा देण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात अाली. 


शासनाकडे पाठपुरावा : 
अवघड क्षेत्रातील महिला, एकल महिला, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पुनर्पदस्थापनेबाबत शासनाकडे पाठ पुरवठा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात अाला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्यासह समन्वय समितीचे प्रकाश चतरकर, संजय भाकरे, प्रकाश चतरकर, शशिकांत गायकवाड, नामदेवराव फाले, केशव मालोकार, संतोष महल्ले, जब्बार हुसैन, देवानंद मोरे, शाम कुलट, रामदास वाघ, महादेव तायडे, रजनिश ठाकरे, माराेती वाराेकार, विलास माेरे, विजय ठाकरे अादी उपस्थित हाेते. 


दृष्टीक्षेप अाक्षेपांवर : 
विस्थापित शिक्षकांनी दिलेल्या ५ पर्यायांशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात अाल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. बदली प्रक्रियेपूर्वी महान येथील एका शाळेत २ पदवीधर शिक्षक हाेते. मात्र या तेथे प्रक्रियेत एकाही पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात अाली नाही. सेवा ज्येष्ठता डावलून बदली केल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. १९९९मध्ये रूजू झालेल्या शिक्षकांना शहरापासून लांबच्या, तर २००७मध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकाची नियुक्ती जवळच्या शाळेत करण्यात अाली. 


थेट मुख्यमंत्र्यांकडे शिक्षक परिषदेची धाव 
शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीप्रक्रिये घाेळाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने साेमवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सविस्तर पत्र पाठवले. पती-पत्नी एकत्रीकरणाला कसा फाटा देण्यात अाला आणि शिक्षिकांची अतिदुर्गम भागात बदली करण्यात अाल्या, याबाबतचा पाढाच पत्रात वाचण्यात अाला अाहे. 


काय अाहे पत्रात 
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) राज्याध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अनेक बाबींचा उहापाेह केला अाहे. 
१) ग्राम विकास विभागाने अाखलेल्या पती-पत्नी एकत्रीकरणाच्या धाेरणाचा विचार न करताना बदली प्रक्रिया राबवली. संवर्ग २ नुसार ३० कि.मी.च्या बाहेरील पती-पत्नीचा विचार करुन त्यांना ३० कि.मी.च्या अात पद स्थापना दिली. ३० कि.मीच्या अातील पती-पत्नीला सेवा संरक्षण न देता ५० ते ९० पेक्षा जास्त कि.मी. अंतरावर बदली केली. 
२) संवर्ग -४ मधील पती-पत्नींना २० गावांचा पर्याय देऊनही त्यांना विस्थापित केले. त्यामुळे बदल्या समान न्याय हक्काच्या तत्वानुसार केल्या नाहीत. 
३) शासन परिपत्रकानुसार गराेदर स्तनदा माता व विधवा शिक्षिकांना त्यांचे मूळ गाव, मूळ तालुकाअंतर्गत पदस्थापना देणे अावश्यक हाेते. मात्र तसे न करता त्यांची दुर्गम भागात बदली करण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...