आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत वाहिनीवरील इंन्सुलेटर जळाले; बार्शीटाकळी अंधारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्याहून बार्शीटाकळीसाठी होणाऱ्या विद्युत वाहिनीवर शनिवारी विजा पडल्या. परिणामी बार्शीटाकळीसह तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडीत झाल्याने बार्शीटाकळी तालुक्यावर अंधारात राहण्याचे संकट ओढवले. महावितरणचे कर्मचारी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम करीत आहेत. एमआयडीसीत १३२ केव्हीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून बार्शीटाकळी तालुक्यासाठी विद्युतपुरवठा करण्यात येतो.


अकोल्यातून बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी, पिंजर व धाबा या उपकेंद्रात ३३ केव्हीच्या विद्युत वाहिनीद्वारे पुरवठा केला जातो. शनिवारी पाऊस आला. या वेळी ढगांच्या ग़डगडाटासह बार्शीटाकळी परिसरात वीज पडल्या. या प्रमुख विद्युत वाहिनीवरील २० ते २५ इन्सुलेटर जळाले. त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्याचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. बार्शीटाकळीचे अभियंता व कर्मचारी हे विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत होते.

 

बातम्या आणखी आहेत...