आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत अाज ओबीसी मेळावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - अोबीसी महासंघातर्फे ओबीसी मेळावा व समाजभूषण पुरस्कार वितरण साेहळा स्वराज्य भवन प्रांगणामध्ये २९ जानेवारीला दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात अाला आहे. या मेळावाच्या माध्यमातून भारिप-बमंसचे स्थानिक नेते अाेबीसी समाजाची माेट बांधण्याचा प्रयत्न करणार अाहेत. मेळाव्याला भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश अांबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक व उद््घाटक म्हणून उपस्थित राहणार अाहेत.

 

मेळाव्याचे स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड असून, प्रमुख पाहुणे आमदार बळीराम सिरस्कार, अॅड. संताेष रहाटे, हरिभाऊ भदे, काशिराम साबळे, डी. एन. खंडारे, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्ला खाँ पठाण, सभापती देवकाबाई पातोंड, , प्रतिभा अवचार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. दशरथ भांडे, भाऊराव अंबाडकर, वसंतराव मुरळ, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, हिरासिंग राठोड, आशाताई इंगळे, मंगला तितुर, अाशा एखे, जे. पी. राऊत, माणिक वनवे, बबलू जगताप, गाजी पटेल, सुभाष रौंदळे, संजय बावणे,लखन घाटोळे, शंकरराव गिऱ्हे, सचिन झापर्डे, गजानन लांडे आदी उपस्थित राहणार आहेत.


कोणत्या विषयावर करणार भाष्य?
पुणे जिल्ह्यातील काेरेगाव भिमाजवळच्या सणसवाडी येथे घडलेला हिंसाचार व नंतर पुकारण्यात अालेल्या महाराष्ट्र बंदनंतर भारिप-बमंसचे नेते अॅड. प्रकाश अांबेडकर प्रथमच अकाेल्यात जाहीर सभेला संबाेधित करणार अाहेत. यंदा हाेणाऱ्या जिल्हा परिषद अाणि पुढील वर्षी हाेणाऱ्या लाेकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अनेक राजकीय पक्ष अाेबीसींची माेट बांधण्याचा प्रयत्न करीत अाहेत. अाता अाेबीसी मेळाव्यात भारिप-बमसं प्रमुख अॅड. प्रकाश अांबेडकर काेणकाेणत्या विषयांवर भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

भारिप-बमंसच्या नेत्यांना डाेहाळे
भारिप-बमसंच्या नेत्यांनी यापूर्वीही अाेबीसी मेळावा घेतला हाेता. त्यानंतर झालेल्या नगर परिषद, नगराध्यक्ष व महापालिका निवडणुकीत भारिप-बमंसला याचा राजकीय फायदा झाला नसल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. तिन्ही निवडणुकांमध्ये भारिप-बमसंची पूर्वीच्या तुलनेने प्रचंड पिछेहाट झाली. त्यामुळे काही नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करुन मेळाव्याचे नियाेजन केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. अाता या मेळाव्याचा किती राजकीय फायदा हाेईल, हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

बातम्या आणखी आहेत...