आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी तालुक्यातील जलांद्रीत अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी (यवतमाळ)-  बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जलांद्री येथे घडली आहे. सावळीपासून सहा कि.मी अंतरावर असलेल्या जलांद्री हे छोटेसे गांव असून त्या ठिकाणी आदिवासी गोंड समाजातील 20-25 कुटूंबे राहतात. बकऱ्या चारण्यासाठी जलांद्री येथील जंगो यशवंत आडे (वय 50) या ठिकाणी गेले होते. त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

 

 

परतीच्या मार्गावर असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साडेतीन ते चार दरम्यान ही घटना घडली. अश्विन कचरे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रत्यन केला  माञ त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...