आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - खदान पोलिस ठाण्यासमोर असलेल्या दक्षता संकुलातील एका दुकानासमोर एक पोलिस कर्मचारी व त्याचे दोन मित्र स्टाईलीश गाडी घेऊन उभे राहीले. दुकानदाराने त्यांना बाजूला सरकण्याचे सांगितले. याच कारणावरून पोलिस व दुकानदारामध्ये वाद झाला.
पोलिसाचा आत्मसन्मान दुखावल्या गेल्याने त्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या दुकानदाराला पाहून आजूबाजूचे दुकानदार धावून आले. ते पोलिसावर धावून जाणार तोच पोलिसांनी खदान पोलिस ठाण्याच्या दिशेने गाडी दामटली. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. तर दुसऱ्या घटनेत सकाळी ११ वाजता सुमारास महावितरणचे कर्मचारी मिटर तपासणी करण्यासाठी पोलिसाच्या घरी गेले असता पथकातील एका महिलेसोबत पोलिसाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.
धीरज शिवकुमार पांडे असे व्यापाऱ्याचे नाव आहे. तर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कार्यरत रामविलास पवार असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धीरज शिवकुमार पांडे यांचे दक्षता संकुलमध्ये श्रीकृष्णा इंटरप्राईजेस नावाचे गोडावून आणि दुकान आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्या गोडावूनमध्ये माल घेऊन वाहन आले होते. वाहनातून माल उतरत असताना दुकानासमोर पोलिस कॉन्स्टेबल पवार व त्याच्या मित्राने त्यांची दुचाकी उभी केली. दुकानात येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होत असल्याने धिरज शिवकुमार पांडे यांनी त्यांना थोडे बाजूला सरकण्याचे म्हटले. मात्र आम्ही पोलिस आहोत, तुझी हिंमत कशी झाली बाजूला सरक म्हणण्याची असे म्हणून त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढल्याने पोलिस कॉन्स्टेबल व त्याचे मित्रांनी धीरज पांडे यांना मारहाण केली. दुकानाबाहेर आणि दुकानाच्या आत मारहाण करत असताना आजूबाजूचे दुकानदार गोळा झाले. गर्दी होत असल्याचे पाहून पोलिस कॉन्स्टेबल व त्याचे मित्र दुचाकी घेऊन निसटले व थेट खदान पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांच्या पाठोपाठ दक्षता संकुलमधील व्यापारी धीरज यांना घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल व इतर दोघांविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी त्यावरून पोलिस कॉन्स्टेबल व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर पोलिस कॉन्स्टेबलने सुद्धा व्यापारी धीरज पांडेविरुद्ध तक्रार दिली.महिला कर्मचाऱ्याला हात धरून आणले रस्त्यावर: निमवाडी पोलिस कॉटर्समध्ये राहणारे विवेक सखाराम चव्हाण यांची वीजबिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खांबावरून खंडीत करण्यात आला आहे. परंतु इलेक्ट्रीक मीटर काढून घ्यावयाचे राहीले होते. त्यावेळी गुरुवारी दुपारी सव्वावाजता महिला कर्मचारी पोलिस कॉर्टरमध्ये थकबाकी वसुलीकरीता ड्युटीवर होती. त्यावेळी विवेक चव्हाण आले. त्यांनी हात पकडून रस्त्यावर ओढत नेऊन काय बोलायचे ते बाहेर येऊन बोल, असे म्हणून अश्लिल शिविगाळ केली, अशा आरोपावरून पोलिस कर्मचारी विवेक चव्हाण विरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.