आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन झाली फसवणूक; दाेघांना परत मिळाली रक्कम, एसपींची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - अाॅनलाईन व्यवहारात फसवणूक झालेल्या दाेघांनी तातडीने पाेलिसांशी संपर्क साधल्याने त्यांनी ती रक्कम परत मिळाली अाहे. पाेलिसांनी अवघ्या २४ तासांत हे पैसे संबंिधताना मिळवून दिले अाहेत. मात्र, ग्राहकांनी फसव्या फाेन काॅल्सला बळी पडून स्वत:च्या बँक खाते, एटीएमबाबतची माहिती फाेनवरून काेणाला देऊ नये, असे अावाहन पाेलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी अायाेजित पत्रकार परिषदेत केले.

 

आॅनलाइन खरेदी करताना दाेन व्यक्तिंच्या खात्यातून परस्पर १ लाख ९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक झाल्याची घटना उजेडात अाली हाेती. या दाेन्ही ग्राहकांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली हाेती. सायबर पोलिसांनी तातडीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून २४ तासांमध्ये त्यांचे पैसे परत मिळवून दिले. तसेच गत तीन महिन्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे ९ लाख रुपये परत मिळवून दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होत.


अशी झाली हाेती फसवणूक
शिवर येथे राहणारे सुधाकर मधुकर वानखडे यांनी १० एप्रिल रोजी पाेलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार नाेंदवली. वानखडे यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज प्राप्त करून मोबाइल फाेन विकत घेतला हाेता. या व्यवहारात त्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले. त्यांनी या कर्जाचे अर्थात मोबाईल फाेनचे पैसे फेडले. त्यानंतर त्यांना एका वित्तीय संस्थेमधून फाेन केला. क्रेडिट कार्ड बंद करण्यात येत असून, कार्ड सुरू ठेवायचे आहे का, अशी विचारणा झाली. त्यांनी होकार दिल्यावर त्यांना ६ आकड्यांचा संदेश मिळाला. हे आकडे बरोबर आहेत का, असे त्यांचा विचारण्यात अाले. यावर वानखडे यांनी होकार दिला. त्यांच्या खात्यातून ६४ हजार ५५० रुपये काढल्याचा संदेश आला.


फसवणुकीचा दुसरा प्रकार माळीपुऱ्यात राहणारे सुधीर गणपत बंड यांच्याबाबत घडला. त्यांनाही एका वित्तीय कंपनीतून फोन आला हाेता. 'तुमचे जुने कार्ड बंद होणार असून, नवीन कार्ड मिळणार आहे', असे त्यांना सांगण्यात अाले. त्यांना माेबाईल फाेनवर येणाऱ्या काही संदेशाची माहिती द्याल', असेही त्यांना सांगण्यात अाले. नंतर पुन्हा माेबाेइल फाेनवर काॅल आला आणि तुमच्या कार्डाच्या माध्यमातून ४५ हजार रुपयांच्या दोन वस्तु खरेदी केल्याचे सांगण्यात अाले.

 

असा लागला छडा
फसवणूक झालेल्या वानखडे व बंड यांनी सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार केली. सायबर पोलिस ठाण्याचे एपीआय प्रवीण धुमाळ, पोलिस शिपाई अतुल अजने यांनी तातडीने दोन्ही तक्रारकर्त्यांच्या पैशांचा वापर करून फ्लीपकार्डवरून खरेदी केल्याचे लक्षात आले. त्यांनी फ्लीपकार्डच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला वस्तुंची डिलिव्हरी थांबवली आणि दोघांनाही त्यांचे पैसे परत मिळवून दिले.

 

बातम्या आणखी आहेत...