आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ हजार पैकी ४,५२६ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी; अाज अखेरचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेला शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलोटे यामुळे खीळ बसल्याचे खरेदी प्रक्रिया मंगळवारी बंद हाेणार असल्याच्या अनुषंगाने अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात एकूण २४ हजार ९ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी अातापर्यंत केवळ ४ हजार ५१६   शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात अाला असून, १९ हजार ४९४ शेतकरी प्रतीक्षेत अाहेत. त्यामुळे २९ मे राेजी संध्याकाळी ५ पर्यंत या शेतकऱ्यांकडे असलेल्या हरभऱ्याची कशी खरेदी हाेणार असा सवाल उपस्थित करण्यात येत अाहे. 


दरम्यान हरभरा व तूर खरेदी आणि चुकाऱ्यांबाबत येत्या दाेन दिवसात सहकार मंत्र्यांसाेबत बैठक हाेणार असून, त्यात निर्णय हाेणार असे, असे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे अकाेला, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, वाडेगाव, पारस तर विदर्भ काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अकाेला व मूर्तिजापूर येथे हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली. मात्र जिल्ह्यातील गाेदाम इतर जिल्हयातील धान्यांनी भरण्यासाठी अकाेल्यातील खरेदी प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात अाली. तूर खरेदीची मुदत कधीच संपुष्टात अाली असून, मंगळवारी हरभरा खरेदी बंद हाेणार अाहे. 


हरभऱ्याचे १७ काेटी थकले
महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने हरभरा खरेदी प्रक्रिया राबवलेल्या शेतकऱ्यांचे अातापर्यंत १६ काेटी ८७ लाख २२ हजार ४०० रुपयांचे चुकारे थकले अाहेत. हे चुकारे ३० हजार ९५८ क्विंटल हरभरा खरेदीपोटी थकले अाहेत. यात अकाेला केंद्रातअंर्गत ४ काेटी ९५ लाख ९० हजार २०० रुपये (९ हजार ९९ क्विंटल), बार्शीटाकळी- ३ काेटी ३० लाख ९४ हजार ६०० (६ हजार ७२ क्विं.), पातूर-९६ लाख ५८ हजार (१ हजार ७७१ क्विं.), पारस- ३ काेटी ७४ लाख ९६ हजार ८०० (६ हजार ८८० क्विं.), तेल्हारा-२ काेटी १७ लाख ६४ हजार ६०० (३ ९९३ क्विं.), वाडेगाव येथील १ काेटी ७१ लाख १८ हजार २०० रुपयांच्या ३ हजार १४० क्विंटल हरभऱ्याचा समावेश अाहे. 


असे अाहे तुरीचे चित्र
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तुरीचे ५० काेटी ९२ लाख ३१ हजार ६६७ रुपयांचे चुकारे थकले अाहेत. महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनकडे नाेंदणी झालेल्या ३१ हजार ७१६ पैकी ८ हजार ९१३ शेतकऱ्यांना ७१ काेटी ३६ लाख ३ हाजर ८१६ रुपये अदा केले अाहेत. विदर्भ काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अातापर्यंत २६ काेटी ३१ लाख रुपये अदा केले असून, १६ काेटी ७६ लाख १२ हजार ८४२ रुपये देणे बाकी अाहे. जिल्ह्यात एकूण ३३ हजार ९९५ शेतकऱ्यांची तूर खरेदी पडून अाहे. 


शेतकऱ्यांची व्हिसीएमएफच्या कार्यालयात धाव 
तुर खरेदी बंद असल्याने आणि हरभरा खरेदीची मुदत संपुष्टात येणार असल्याच्या पृष्ठभूमीवर साेमवारी शेतकऱ्यांनी विदर्भ काॅ-अाॅप मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात धाव घेतली. मूर्तिजापूर येथील दिलीप पाटील, अकोट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू बाेचे , नीलेश पाटील अाव्हाळे, राजू पाटील राऊत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चुकीच्या पद्धतीने खरेदी प्रक्रिया केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे हाेते. खरेदी व चुकारेही थकले अाहेत. त्यामुळे अाठ दिवसात हे प्रश्न मार्गी न लागल्यास अांदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 
संतप्त नातेवाइकांनी युवकाचा मृतदेह अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. 

बातम्या आणखी आहेत...