आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव माेहिम; गाडीला लागूनच काेसळला 'त्या' इमारतीचा भाग, दुचाकीस्वार बचावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- उमरी ते गुडधीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मनपानेे मंगळवारीही अतिक्रमण हटाव माेहिम राबवली. एका घराचे अतिक्रमित बांधकाम पडताना एक दुचाकीस्वार दैव बलवत्तर असल्याने थोडक्यात बचावला. त्याच्या वाहनाला लागूनच इमारतीचा भाग काेसळला. त्यामुळे अतिक्रमण पाडताना सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी न घेतल्यास माेठी दुर्घटना घडू शकते, हे मंगळवारी मोहिमेदरम्यान घडलेल्या प्रकारावर नजर टाकल्यास दिसून येते. 


माेठी उमरी ते गुडधीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाची मागणी पुढे अाली. मात्र रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न रखडला हाेता. रेल्वे लाईन ते फत्तेपूरवाडीपर्यंत रस्ता माेजणीचा विषय एैरणीवर अाला. मध्यंतरी चुकीच्या माेजणीनेे काही व्यापारी, नागरिक अडचणीत अाले हाेते. नंतर या रस्त्यासाठी निधी आला, अतिक्रमितांनी अतिक्रमण काढण्यासाठी मनपा प्रशासन व नगरसेवकांची बैठक झाली. त्यात १ जूनपर्यंत अतिक्रमण काढण्याचे अावाहन केले. मात्र २ जुलैनंतर मनपा अतिक्रमण हटवेल, असा निर्णय घेतला. त्यानुसार मनपाने अतिक्रमण पाडण्यास प्रारंभ केला. 


समाेर पाहून गाडी चालवा

अतिक्रमण पाडताना वाहन चालकही माेहिम पाहण्यासाठी थांबत हाेते. या ठिकाणी वाहतूक पोलिसही तैनात हाेते. अनेक वाहन चालकांची नजर समाेरएेवजी अतिक्रमण पाडतानाकडे हाेती. परिणामी अपघाताची शक्यता हाेता. त्यामुळे तेथे तैनात वाहतूक पोलिसांवर वाहन चालकांना 'समाेर पाहून गाडी चालवा', असे म्हणण्याची वेळ अाली हाेती. 


असे पाडले 'ते' बांधकाम
उमरी राेडवर वळणावर दाेन मजली इमारतीचा अतिक्रमित भाग पाडला. पिल्लर खिळखिळे करुन दाेन खाेल्या पाडल्या. वरील भाग पडणार अाहे, याची माहिती पाेलिस, मनपाचे पथकास नगरिकांना हाेती. तेवढ्यात या इमारतीचा अतिक्रमित भाग काेळसला. यातील माेठा भाग रस्त्यावर पडला. त्याचवेळी दुचाकीस्वार युवक तेथून गेला. भाग काेसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवले व इमारतीचा भाग त्याच्या वाहनाजवळ काेसळला. सुदैवाने काेणीही जखमी झाले नाही. अतिक्रमण हटवताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सिव्हिल लाइन्स पोलिस व वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात केले हाेते. दरम्यान अनेकांनी स्वत: आपले अतिक्रमण हटवले. 


बघ्यांमुळे अडथळे 
उमरी ते गुडधीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवतानाच बंघ्यांच्या गर्दीनेे मोहिमेत अडचणी निर्माण हाेत असल्याचे दिसले. रस्ता अरुंद व वळणाचा असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु हाेती. याच ठिकाणी एकाच बाजूने सांडपाणी वाहते. तेथेच अतिक्रमण पाडण्याचे काम महापालिकेच्या जेसीबीने सुरु हाेते. अशातच बघ्यांमुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत हाेती. 

बातम्या आणखी आहेत...