आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रेत्यांनी दिल्या प्लास्टिक पिशव्या; अधिकारी म्हणाले, दंडाचा चेक द्या !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्लास्टिक बंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महापालिकेतर्फे शहरातील चारही झाेनमध्ये केवळ पाच ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात अाली. २४ जून राेजी पाच व्यावसायिकांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड आकारण्यात अाला. त्यामुळे मोहिमेचा असा फज्जा उडू नये, यासाठी वरिष्ठांनी पुढाकार घेणे किती गरजेचे अाहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. पूर्व झाेनमध्ये मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठानमध्ये धाव घेताच तेथील व्यावसायिकाने स्वत:हून प्लास्टिक पिशव्या, ग्लास अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले; सुपुर्दतेची प्रक्रिया पार पडत असतानाच अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाला अाता अायुक्तांच्या नावे धनादेशही द्या, असे म्हणताच व्यावसायिकास दंड अाकारल्याची जाणीव झाली. त्यांनी काही क्षणातच ५ हजारांंचा धनादेशही दिला. दाेन दिवसात १२ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी कारवाईमुळे मात्र अनेकांचे धाबे दणाणले अाहेत. शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून बंदीचे स्वागत झाले, तर प्लास्टिक अभावी अकाेलेकरांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र दिसून अाले. 


राज्य शासनाने २३ मार्चला प्लास्टिक, थर्माकाेल वस्तूंवर बंदीची अधिसूचना जारी केली. त्यानंतर प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. प्रारंभी प्रशासनाने नागरिकांना प्लास्टिक बंदीचे अावाहन केले. व्यापारी व नागरिकांना त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाटीाचे सांगितले हाेते. दरम्यान २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठाेर अंमलबजावणी सुरु झाली अाहे. 


या वस्तूंवर अाहे बंदी
पूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी हाेती, मात्र सरसकट बंदी अाहे. दुधाच्या पॅक पिशव्या या पुनर्प्रक्रिया करुन वापरणे बंधनकारक अाहे. अधिसूचनेनुसार थर्माकाेल व प्लास्टिकपासून तयार पिशव्या, ताट, कप,प्लेट्स, ग्लास, काटे चमचे, वाटी,स्ट्राॅ, नाॅन अाेव्हन पाॅलिप्राॅपिलेन बॅग, पाणी पाऊचचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री,अायात व वाहतूकीस बंदी अाहे. हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठीचे भांडे, वाटी, सजावटीसाठी प्लास्टिक, थर्माकाॅल, द्रवपदार्थ साठवण्यासाठीचे प्लास्टिक , अन्नपदार्थ, धान्य साठवण्यासाठीचेे प्लास्टिक व वेष्टनावर बंदी अाहे. 


व्यापाऱ्यांची कसरत
प्लास्टिक बंदीमुळे किरकोळ व्यावसायिकांची कसरत हाेत असल्याचे चित्र रविवारी भाजी, फळ बाजारात पाहावयास मिळाले. अांबे, जांभूळ, मक्याचे कणसं हे कागदी पिशव्यांमध्ये देण्यात येत हाेते. फळं कागदात गुंडाळून देताना विक्रेत्यांची कसरत हाेत हाेती. गर्दीच्या वेळी त्यांना फळं गुंडाळताना कागद फाटणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागत हाेती. 


अशी उडाली ग्राहकांची त्रेधा
रविवार असल्याने अनेक जण कापडी पिशवी घेऊन बाजारात खरेदीसाठी पाेहाेचले. जनता बाजार, जुना भाजी बाजार, जयहिंद चाैक परिसरातील बाजारात भाजी व फळ खरेदीसाठी अनेकांकडे कापडी पिशव्या हाेत्या. मात्र भुईमुगाच्या शेंगा, शिंगाडे, जांभूळ कागदांमध्ये गुंडळल्यानंतर ते पिशवीत ठेवताना दुसऱ्या वस्तूमुळे कागद फाटणार नाही, याची काळजी ग्राहकांना घ्यावी लागत हाेती. 


या ठिकाणी राबवली मोहिम 
प्लास्टिकबंदीनंतर महापालिकेने रविवारी माेहिम राबवली. यात शहरातील गोपाल डेअरी, सुभाष स्टोअर्स, राजेश कुमार भाला, कॅफे -९ , फुट स्पॉट यांचा समावेश हाेता. या सर्व प्रतिष्ठांनाना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अाकारण्यात अाला. तसेच शनिवारी सात व्यावसायिकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड अाकारण्यात अाला. यात बिकानेर स्वीट मार्ट, सांगलीवाला, जैन रेडिमेड, राॅयल बेकरी, सागर बेकरीचा समावेश हाेता. या कारवाईत आरोग्य निरीक्षक आय.एम.काजी, नितीन नागलकर, अ.सलीम, मो.अलीम, सिद्धार्थ भागडे, मो.अलीम, किरण खंडारे, कुणाल भातकुले, प्रशिस भातकुले, प्रशांत जाधव, शुभम पुंड, सुनील कंडेरा आदींची उपस्थिती होती. 


प्रशासनाला सहकार्य करा: मनपा अायुक्त 
नागरिक व व्यापाऱ्यांनी बंदी घालण्यात आलेल्या थर्माकाॅल, प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या कॅरीबॅग, ग्लास, वाटी आदीं वस्तूंचा वापर व विक्री बंद करावी. बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंचा साठा असल्यास संबंधितांनी ते साहित्य खोलेश्वर येथे असलेल्या महापालिकेच्या मोटर वाहन विभागात जमा करुन प्रशासनाला सहकार्य करावे. 
- जितेंद्र वाघ, अायुक्त, महापालिका. 

बातम्या आणखी आहेत...