आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- गाय चोरून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तर या घटनेतील मुख्य आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, आरोपींना आज न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


मलकापूर शहरचे ठाणेदार रवींद्र देशमुख व त्यांचे सहकारी रात्री शहरात गस्त घालत असताना त्यांना आठवडी बाजारात चार जण गाय घेवून जाताना दिसून आले. पोलिसांनी हटकले असता त्यातील एक जण पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गाईसह शेख साबीर शेख अहमद, म. जावेद म. सिध्दीकी रा. सायकलपूरा व भीमनगरातील विक्रम उर्फ विकी सरदार या तीन जणांना अटक केली. तर या घटनेतील मुख्य आरोपी शेख सैय्यद शेख जलील हा फरार झाला आहे. दरम्यान आज तीनही आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध शहर पोलिस घेत आहेत. 


गायचोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी 
मलकापूर शहरातील गाई चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे आज २६ जून रोजी करण्यात आली. शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रात्री बे रात्री खुंट्यावर बांधलेल्या व मोकाट गाई वासरे चोरी जाण्याचे प्रकार घडत आहे. चोरून नेलेल्या गाई कत्तलखान्यात नेल्या जात असल्याची शक्यता आहे. या आधी सुद्धा परिसरातून गाई चोरीस गेलेल्या आहेत. त्या गाई मालकांना परत कराव्यात. तसेच चोरी करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी करून गाई चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात यावा, अशी मागणी बजरंग दलाचे दीपक कपले, मोहनसिंग राजपूत, मनिष लखानी, ललीत डवले, सतीश भोंबे, प्रफुल्ल नारखडे, धीरज खर्चे, पप्पू ठाकूर व रोशन तायडे यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...