आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरती: 68 जागांसाठी 11 हजार अर्ज, 12 मार्चपासून होणार सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला पोलिस दलातील ६८ जागांसाठी तब्बल ११ हजार अर्ज आले आहेत. पोलिस भरतीसाठीची शारीरिक चाचणी १२ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याची माहिती उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ११ हजार उमेदवारांनी केलेल्या अर्जावरून बेरोजगारी किती आहे, हे अधोरेखित होत आहेे.


राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अकोला पोलिस दलामध्ये या वर्षी ६८ जागांसाठी भरती होणार आहे. या जांगासाठी अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारी होती. तर, प्रत्यक्ष मैदानी चाचणीला सात मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र, सरकारने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. तर शारीरिक चाचणीची तारीख वाढवून ती १२ मार्च करण्यात आली. उमेदवारांना अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाल्यानंतर ६८ जागांसाठी तब्बल ११ हजार अर्ज आले आहेत. गत पोलिस भरतीमध्ये डमी विद्यार्थी बसल्याचे समोर आल्यानंतर फिंगर प्रिंट घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, भरती पूर्ण चित्रीकरण करण्यात येत आहे.

 

१२ मार्चपासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात व पोलिस मुख्यालय मैदानावर मैदानी व लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलिस भरतीसाठी अर्ज मागविण्याचे काम महा ऑनलाइनकडे देण्यात आले होते.
पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी हजर राहायचे याची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे.

 

उच्च शिक्षितही रांगेत
पोलिस भरतीसाठी १२ वी पास ही शैक्षणिक पात्रता असतानाही पदवी, पदव्युत्तर, बीएड, एमएड, एलएलबी, इंजिनिअरिंगचे युवकही पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. यावरून बेरोजगारीने उच्चांग गाठल्याचे दिसून येते.

 

कुणाच्याही आमिषाला बळू पडू नका
उमेदवारांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, आपल्या कर्तत्वावर विश्वास ठेवावा. कुणी वशिल्याचे आमिष देत असेल, त्याची पोलिसांना माहिती द्या. उमेदवारांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होईल.
- एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक.

 

२००० मधून होणार २१ महिलांची निवड
पोलिस शिपाई पदासाठी ४२ जागा खुल्या आहेत. उर्वरित अजा ३, भज (ब) १, विमाप्र १०, इमाव १२ जागा रिक्त आहेत. या जागा सर्वसाधारणसाठी १३, महिलासाठी १३, खेळाडू २, प्रकल्पग्रस्त २, भूकंपग्रस्त १, माजी सैनिक ६, अंशकालीन पदवीधर २, पोलिस पाल्य १, होमगार्डसाठी २ तर महिलांसाठी २१ जागा राखीव आहेत. भरतीदरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा होईल.

बातम्या आणखी आहेत...