आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम फोडून ५३ लाखांची रोकड लांबवणाऱ्या 'त्या' चार आरोपींना कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- नागपुरातील एटीएम फोडून ५३ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या हरियाणा राज्यातील चार आरोपींना खामगाव पोलिसांनी बुधवारी, २७ जून रोजी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतूस, स्कॉर्पिओ गाडी व रोख ५३ लाख रुपये जप्त केले होते. दरम्यान, आज, २८ जून रोजी आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस कर्मचारी रफिक शहा, दिनकर राठोड व भगवान वानखडे हे २७ जून रोजी महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल जुगनू जवळ वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, त्यांना दिल्ली पासिंगची एक स्कॉर्पिओ संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. या वाहनावर संशय आल्याने त्यांनी गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून चालकास थांबवले. जुन्या टोल नाक्याजवळ गाडीचे कागदपत्रे तपासणी करत असताना गाडीत बसून असलेले पाच जण घाबरलेल्या स्थितीत दिसून आले. या वेळी चालकास गाडीची डिक्की उघडण्याची सूूचना केली असता चालकाने वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला. परंतु, वाहन सोडून आरोपी पसार झाले होते. 


दरम्यान, चिखली खुर्द गावात काही नागरिकांनी या घटनेतील दोघांना बॅगसह पकडले. या बॅगमध्ये पैसे व देशी कट्टा असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. तर दोन आरोपींना नांदुरा रोडवरील एका ढाब्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दल्ला मजीद, इरफान खान जाणू खान सर्व रा. हरियाणा अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आज चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...