आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून पोलिस कर्मचाऱ्याने महिलेवर दोन वर्ष केला अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अडीच वर्षांपुर्वी एक महिला सासूची तक्रार देण्यासाठी वलगाव पोलिस ठाण्यात पोहचली होती. त्यावेळी तिने तक्रार अर्ज दिला होता, त्यावर स्वत:चा मोबाईल क्रमांक टाकला होता. याव्दारेच वलगाव ठाण्याला कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाची त्या महिलेसोबत ओळख झाली. ओळखीतून विश्वास संपादन करून त्या पोलिसाने मागील दोन वर्षांपासून शारिरिक शोषण करून फसवणूक केल्याची तक्रार पिडीत महीलेने रविवारी (दि. ८) गाडगेनगर पेालिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री त्या पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 


चंद्रशेखर अशोकराव काळे (३२, रा. पोलिस वसाहत, मालटेकडी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. काळे मागील काही वर्षांपासून वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.  


आरोपी चंद्रशेखरने विश्वासघात करून शोषण केल्याची तक्रार पिडीतेने गाडगेनगर ठाण्यात दिल्यामुळे पोलिसांनी पोलिस शिपाई चंद्रशेखर काळेविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


पुढील स्लाइडवर वाचा, महिलेला दाखवले लग्नाचे आणि नोकरीचे आमिष....

बातम्या आणखी आहेत...