आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधून ठेवण्याचा इशारा देताच धनादेश केले जमा, प्रहार संघटनेचा सीईअाेंच्या कक्षात ठिय्या अांदाेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - राजीव गांधी अपघात विमा याेजनेची रक्कम आणि दिव्यांगांना लाभ मिळत नसल्याने मंगळवारी प्रहार संघटनेने जिल्हा परिषदेत धाव घेत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) यांच्या कक्षात ठिय्या अांदाेलन केले. दाेर साेबत अाणलेल्या कार्यकर्त्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास आणि संबंधितांवर कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना येथेच बांधून ठेवण्याचा इशारा दिला. सीईअाेंनीही अांदाेलकांच्या मागण्या रास्तच असल्याचे सांगत विमा व अपंग निधी हा संवेदनशील विषय असून, याबाबत विलंब झाल्याने संबंधितांवर जबाबदारी निश्चित करा, असा अादेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर सुमारे दीड तासाने शिक्षण विभागाने १६ लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी १२ लाखांचा धनादेश व साेबत इतर दस्तावेज स्टेट बँकेला दिले.


अंपगांचा निधी खर्च करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हा परिषदेला डिसेंबर महिन्यात दिली हाेती, हे येथे उल्लेखनीय राजीव गांधी अपघात विमा याेजनेची रक्कम लाभार्थींना मिळत नसल्याने २३ नाेव्हेंबर २०१७ राेजी प्रहार संघटनेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र दिले हाेते. या याेजनेअंतर्गत विद्यार्थी किंवा कुटुंबियांना ७५ हजार रुपये देण्यात येतात. मात्र अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील १६ लाभार्थी या लाभापासून वंचित अाहे.दरम्यान, १६ जानेवारी राेजी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट सीईअाे एस. रामामूर्ती यांच्या कक्षात धाव घेतली. कार्यकर्त्यांनी प्रचंड घाेषणाबाजी केली. सीईअाेंच्या कक्षात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, समाज कल्याण अधिकारी याेगेश जवादे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपस्थित होते. त्यानंतर सीईअाेंनी कारवाईचे अाश्वासन दिल्याने अांदाेलन तुर्तास मागे घेण्यात अाले. अांदाेलनात प्रहारच्या शेतकरी अाघाडीचे जिल्हाप्रमुख शाम राऊत व नीलेश ठाेकळ यांच्यासह अतुल काळणे, संताेष पाटील, गाेविंद गिरी, कुलदीपसिंग बावरी, विक्की बावरी, राजू बावरी, पंकज तेलगाेटे, श्रीकृष्ण भुईभार, अादित्य काेकाटे, उमेश पाटील, जाॅन जामनिक अादी सहभागी झाले हाेते.

 

का झाला विलंब ?: १) अपघात विम्याची रक्कम १८ डिसेंबर राेजी प्राप्त झाल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर प्रक्रिया वेगाने राबवणे सुरु अाहे. ट्रेझरीमध्ये देयक दिले अाहे, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. २) अपंगांच्या याेजनाबाबत समाकल्याण अधिकारी यांनी लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. याबाबत लाभार्थींनाही कळवण्यात अाल्याचे स्पष्ट केले.

 

अशा झाल्या हालचाली: प्रहार संघटनेने दुपारी २.३० वाजता सीईअाेंच्या कक्षात प्रवेश केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने धनादेश जमा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. सीईअाें व अतिरिक्त सीईअाे ३.३५ िमनीटांनी कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यानंतर ४.१५ वाजताच्या सुमारास धनादेश जमा झाला.


लाभार्थ्यांना राेख रक्कम का देत नाही?
अांदाेलकांनी कक्षातूनच सीईअाे एस. रामामूर्ती व प्रहार जनशक्ती पक्षाने प्रमुख अामदार बच्चू कडू यांचा माेबाईल फाेनद्वारे संवाद घडवून अाणला. अपंग लाभार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी राेख रक्कम का देत नाही, अद्याप याेजना रखडली असे सवाल कडू यांनी उपस्थित केले. यावर प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत असून, लाभार्थींनी साहित्याचे देयक सादर केल्यानंतर त्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे सीईअाे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...