आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल कॉलेज: विभागप्रमुखाविरुद्ध प्राध्यापिकेची तक्रार, आत्मदहनाचा दिला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषधी विभाग प्रमुख डॉ. अरुण हुमणे यांच्याविरुद्ध सोमवारी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. सहयोगी प्राध्यापक डॉ. कल्पना काळे(अस्वार) यांनी ही तक्रार दिली आहे. कायदेशीर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

डॉ. अरुण हुमणे व डॉ. कल्पना काळे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत. या वादाने आता उग्र रूप धारण केले आहे. डॉ. अरुण हुमणे हे आपल्याला व पतीला कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत आहेत. निनावी नावाने तक्रारी करीत आहेत. कनिष्ठ प्राध्यापकांना आपल्याविरुद्ध भडकावून बोलण्यास मनाई करून तसे त्यांना धमकावत आहेत. वैयक्तिक टीकाही ते करीत आहेत, सिनिअर असताना आपणास डावलून कनिष्ठ प्राध्यापकांना कामाचे वाटप करतात व आपण कामच करीत नाहीत, असा तक्रारी वरिष्ठांकडे करतात, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करण्याकरीता धमकी देतात. आपली इंटरनॅशनल हुमन राइट्स असोसिएशन येथे एक्झामिनर म्हणून झालेली निवड कशी चुकीची आहे, असे दर्शवून असोसिएशनतर्फे आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली आहे, असे गंभीर आरोप डॉ. काळे यांनी तक्रारीत केले आहेत. डॉ. हुमणे यांच्या वागणुकीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, आता सहन न करण्यापलिकडे सर्व प्रकार असल्याने तत्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा डॉ. काळे यांनी तक्रारीतून दिला आहे.

 

चौकशी समिती गठीत
यापूर्वी सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा वाद समोर आल्याने उच्चस्तरीय समितीला चौकशीचे आदेश दिले असून,ही समिती अहवाल देईल. डॉ. काळे व डॉ. हुमने यांच्यातील वाद सामोपचाराने मिटावेत,यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. -डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला.

बातम्या आणखी आहेत...