आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाला प्रारंभ; मात्र प्रकल्प जलसाठ्यात वाढ नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एक जून पासून पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत तीन वेळा जोरदार पाऊस झाला. मात्र अद्याप जिल्ह्यातील कोणत्याही जल प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात १०० कोटी २० लाख लिटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. यावर्षी जूनमध्ये पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ जुनलाच जोरदार पाऊस झाला. तर ५ जून ला वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० जुनच्या रात्रीही पावसाने हजेरी लावली.

 

जूनमध्ये शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची नोंद झाली. त्यानुसार एक जून पासून काटेपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रात ११२ मि.मी. मोर्णाच्या पाणलोट क्षेत्रात ९५ मि.मी. निर्गुणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ५१ मि.मी., उमा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ८५ मि.मी., दगड पारवाच्या पाणलोट क्षेत्रात ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र कोणत्याही प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ झाली नाही. प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. 


वान प्रकल्प परिसरात अत्यल्प पाऊस
जिल्ह्यातील इतर जल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राच्या तुलनेने वान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून अत्यल्प पावसाची नोंद झाली. १ ते ११ जून दरम्यान वानच्या पाणलोट क्षेत्रात १२ मि.मी. पावसाची नोंद झाली. 


प्रकल्पातील जलपातळी अशी आहे

काटेपूर्णा :१.०२ दलघमी, वान : ५०.७२ दलघमी, मोर्णा : २.७० दलघमी , निर्गुणा : कोरडा , उमा : कोरडा, दगडपारवा : कोरडा. 

बातम्या आणखी आहेत...