आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी भारिप-बमसंची निदर्शने; रस्त्यावरच ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - भिमा काेरेगाव हिंसाचारप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजींनी भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या चाैकशीची मागणी केल्याचे पडसाद मंगळवारी अकाेल्यात उमटले. भारिप-बमंसने मदनलाल धिंग्रा चाैकात भिंडेंविराेधात निदर्शने करीत त्यांच्या अटकेची मागणी केली. तसेच यावेळी रस्त्यावरच ठिय्या देत भाजप सरकारचा निषेधही केला.

 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळेच महाराष्ट्र पेटल्याचा अाराेप करीत एल्गार परिषदेकडून दंगलीच्या नुकसानभरपाईची वसुली करण्याची मागणीही संभाजी उर्फ मनाेहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केली हाेती. दरम्यान, २० मार्च राेजी भारिप-बमंसचे पदाधिकारी-कार्यकर्ते भिडेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी भिंडेंच्या वक्तव्याचा, मागणीचा निषेध करीत घाेषणा दिल्या. पाेलिसांनी अांदाेलकांवर कारवाई केली. अांदाेलनात भारिप- बहुजन महासंघाचे डी. एन. खंडारे, राजेंद्र पातोडे,गजानन गवई, प्रदिप वानखडे, सम्राट सुरवाडे, नितेश किर्तक, अशोक सिरसाट, शोभा शेळके, प्रतिभा अवचार, अमाेल शिरसाट, बुद्धरत्न इंगाेले, वंदना वासनिक, सुभाष राैंदळे, धर्मेंद्र दंदी, संताेष गवई, मंगेश गवई, राजकुमार दामाेदर, शेख साबीर शेख मुसा, विकास सदांशिव, ज्ञानेश्वर सुलताने, जीवन डिगे, पुष्पा इंगळे, गौतम सिरसाट, आसिफ खान, जीवन डिगे, सचिन शिराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपतणे सहभागी झाले हाेते.

 

मुंबईच्या मोर्चात जाणार २५ हजार कार्यकर्ते : संभाजी भिडेंना अटक करण्याच्या मागणीसाठी मुंबईत निघणाऱ्या माेर्चाच्या पृष्ठभूमीवर २० मार्च राेजी बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती.

 

आबासाहेब खेडकर सभागृहात झालेल्या बैठकीला भारिप बमसंचे अाजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित हाेते. संभाजी भिडे यास २६ मार्चपर्यंत अटक करा; अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी दिला अाहे.


या पृष्ठभूमीवर मोर्चात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात अाले. जिल्हयातून २५ हजार नागरिक माेर्चात सहभागी हाेण्याचा दावा अायाेजकांकडून करण्यात अाला. रेल्वे, बसेसे व खासगी वाहनांनी माेर्चेकर मुबंईला जाणार अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...