आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, पंतप्रधान सडक योजनेच्या कार्यालयासमोर दिले धरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विविध प्रलंबित मागण्यांची पुर्तता न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेची कामे सांभाळणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान हे आंदोलन लोकाभिमुख होण्यासाठी संबंधितांनी मुर्तीजापूर रोड स्थित पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

 

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करुनही कोणतीच सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या मागणीसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. परंतु प्रत्येक वेळा आश्वासनाशिवाय काहीही प्राप्त झाले नाही. त्यामुळे आजपासून राज्यभरातील साडेसातशे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याचे स्थानिक आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या नावाखाली सुरु असलेल्या या लढ्यात जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सर्व कामे ठप्प पडली आहेत. संघटनेचे अध्यक्ष विलास डेकाटे व सचिव सुनील पळसकर यांच्या नेतृत्त्वात स्थानिक पदाधिकारी विलास गोळे, ढवळे आदी सहकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.

 

शासनाने कायमस्वरुपी कामासाठी नेमणूक केली असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, महिला कर्मचाऱ्यांना किमान प्रसुती रजा लागू करा, सर्व कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करा, सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांसारखे वेतन लागू करुन दरवर्षी त्यांच्यासारखीच पाच टक्के वेतनवाढ लागू करा अशा या संघटनेच्या मागण्या आहेत.

 

आश्वासन पाळले नाही
विशेष असे की यापूर्वी काही कर्मचाऱ्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला, त्यावेळी झालेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळी शासनाने हे मुद्दे मान्यही केले. मात्र त्याची पुर्तता अद्याप केली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईस्तोवर कामावर परतायचे नाही, असा संबंधितांचा संकल्प आहे.

 

बातम्या आणखी आहेत...