आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कासाेधा' तील मागण्यांसाठी फुंकला धरणे अांदाेलनाचा बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- कापूस-सोयाबीन-धान (कासाेधा) परिषदेतील मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचातर्फे शुक्रवार, २३ फेब्रुवारी राेजी धरणे अांदाेलन करण्यात अाले. याच वेळी अांदाेलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात अाली. राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात उपोषण करण्यात येणार असून, याबाबत याच मुद्द्यांवर पाच पेक्षा जास्त अामदार प्रश्न उपस्थित करणार अाहेत. तसेच १९ मार्चपासून १० शेतकरी बेमुदत उपोषण करणार असून, त्यांच्यासाेबत तालुकानिहाय शेतकरी साखळी उपोषण करणार अाहेत. 


शेतकऱ्यांच्या अार्थिक हक्कांचा लढा तीव्र हाेण्यासाठी ३ डिसेंबर राेजी कसाेधा (कापूस-सोयाबीन-धान) परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. शेतकरी जागर मंचातर्फे पार पडलेल्या या परिषदेला माजी अर्थमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा प्रामुख्याने उपस्थित हाेते. त्यानंतर ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत सिन्हा यांनी शेतकऱ्यांसाेबत घेत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ठिय्या अांदाेलन केले हाेते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली हाेती. 


या मागण्यांसाठी अांदाेलन

कासाेधातील मागण्या पूर्ण हाेण्यासाठी अांदाेलन करण्यात अाले. यामध्ये भावांतर याेजना लागू करणे, दुष्काळी अनुदान मिळणे, साेने तारण कर्जमाफीच्या अटी रद्द कराव्यात, विनाअट व सरसकट शेतकरी कर्जमाफी कोणताही निकष न लावता देण्यात यावी, बाेंड अळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणे, पीक विमा तातडीने देण्यात यावा अादींचा समावेश हाेता. 


...तर परिणामांची जबाबदारी प्रशासनाची
शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ६ डिसेंबर राेजी सरकारतर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या हाेत्या. मात्र यानुसार कार्यवाही झालेली नाही. तसेच अवकाळी व गारपीटमुळेही पिकांचे नुकसान झाले अाहे. ही मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे याबाबत १५ दिवसात याेग्य कार्यवाही न न झाल्यास सर्व परिणामांची जबाबदार प्रशासनाची असेल, असा इशारा मंचाने निवेदनात दिला अाहे. धरणे अांदाेलनात प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, कृष्णा अंधारे, संजयराजू पाटील मंगळे, जगदीश मुरुमकार, मनाेज तायडे, शिवाजी म्हैसने, माे. रेहान, अन्सार शेख, दिलीप माेहाेड, रवी अरबट, रितेश महल्ले, दिनकर वाघ, माे. शरीफ, ज्ञानेश्वर गावंडे, अर्चना पाटील, अादी सहभागी झाले हाेते. 


प्रति एकर ५० हजार रुपये कर्ज द्या 
प्रती एकर ५० हजार रुपये कर्ज मिळण्यासह डिसेंबर महिन्यात केलेल्या अांदाेलनातील मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने पुन्हा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला अाहे. शुक्रवारी धरणे अांदाेलनानंतर दिशा जाहीर करण्यात अाली. याच अांदाेलनाचा भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची माेठी सभा अकोल्यात हाेणार अाहे. या सभेनंतरच हे अांदाेलन किती पेटेल, हे दिसून येणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...