आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणामुळे बुजली नाली; पावसाचे पाणी रस्त्यावर; डबक्यात केले आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- डाबकी राेडवर अतिक्रमणामुळे नाल्या बुजल्याने रस्त्यावर साचलेल्या डबक्यातच शिवसैनिक व नागरिकांनी बुधवारी अांदाेलन केले. पावसातच अांदाेलन केल्याने मनपाला दखल घ्यावी लागली. काही वेळेतच जेसीबीच्या सहाय्याने नाल्या माेकळ्या केल्याने पाण्याचा निचरा झाला. रस्त्यावरील डबक्याची समस्या कायमस्वरुपी न साेडवल्यास यापेक्षाही तीव्र अांदाेलनाचा इशारा नागरिकांनी दिला. 


पावसाळ्यात जुने शहरातील डाबकी रोडवर पाणी साचते. त्यामुळे बुधवारी शिवसैनिक व नागरिकांनी अांदाेलन करीत मनपाचा निषेध केला. नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनात शिवसेनेचे अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, नगरसेवक शशिकांत चोपडे, गजानन चव्हाण, महिला आघाडीच्या ज्योत्स्ना चोरे, नीलिमा तिजारे, विशाल इचे, सुनील कुकरे, गजानन बोराळे, अमित सावरकर, मदन चोपडे, योगेश गिते आदींसह शिवसैनिक, परिसरातील नागरिक व व्यावसायिक सहभागी झाले हाेते. 


येथे साचते पाणी
कस्तुरबा गांधी रुग्णालय ते कॅनॉलपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचते. यात श्याम पोतदार यांच्या दुकानासमोर, वाडेकर किराणा दुकानासमोर पाणी साचते. याबाबत नगरसेवकांनी महापौर व मनपा आयुक्तांना निवेदन दिले हाेते. पाण्याची विल्हेवाट लावणे व येथे पाणी साचू नये , यासाठी उपाय योजनेची विनंती केली हाेती. मात्र याची दखल न घेतल्याने ११ जुलैला अांदाेलन करण्यात अाले. 


...तरीही चालकांनी मार्ग शोधलाच
शिवसैनिक, नागरिकांची रस्त्यावरील पाण्यातच ठिय्या दिला. मात्र त्यामुळे वाहतूक अन्य मार्गांनी वळवली हाेती. डाबकी रोडवर साचलेल्या पाण्याचा त्रास होत असल्याने नगरसेवकाने पाण्यात ठिय्या दिल्याची माहिती मिळतानाच ठाणेदार साेळंके यांनी कर्मचाऱ्यासह धाव घेतली. अांदाेलनाच्या ठिकाणी उपअभियंता राजेंद्र टापरे आणि सहायक अायुक्त राजेंद्र घनबहादूर यांनी अांदाेलकांशी संवाद साधला. यावर नगरसेवक राजेश मिश्रा यांनी टापरे यांनी तुम्हाला शब्द देण्याचा, काम करुन देण्याचा अधिकार अाहे काय, असा सवाल केला. त्यानंतर टापरेंनी नंतर मनपाच्या इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. काही वेळाने घटनास्थळी उपअभियंत्यांनी अांदाेलकांशी पुन्हा संवाद साधला. १ ते २ दिवसात ही समस्या दूर करण्याचे अावश्वासन िदले. त्यामुळे अांदाेलन मागे घेण्यात आले. 


...त्यामुळे रस्त्यावर साचतात डबके 
डाबकी राेडवर रस्त्यावर १० पेक्षा फुट पेक्षा जास्त अंतरापर्यंत अनेक ठिकाणी दुकाने, घरांची बांधकाम करण्यात अाले अाहे. अनेक ठिकाणी नाल्यांवर धापे टाकले. मात्र बहुता:श ठिकाणी या धाप्यावरच दुकानदारांनी बांधकाम केले. त्यामुळे पाण्याचा निचरा हाेण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे बुधवारीही रस्त्यावर माेठ्या प्रमाणात पाणी साचले आणि नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावरच उतरले. 

बातम्या आणखी आहेत...