आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्यासह अमरावती, अकाेल्यात पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- अकाेला, अमरावती, बुलडाण्यात साेमवारी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे चिंताग्रस्त झालेला शेतकरी थाेडा सुखावला अाहे. तरी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम अाहे. अकाेला जिल्ह्यात शनिवारी सकाळी जोरदार आगमन झालेल्या पावसाने परत दोन दिवस विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही हा रिपरिप पाऊस आनंद देवून गेला. 


अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह २० मिनिटे पाऊस 
अमरावती जिल्ह्यात सायंकाळी ७.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुमारे २० मिनिटे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा हाेता. दुपारी उकाडा तर रात्री गारवा असेच काहीसा अनुभव गेल्या चार दिवसांपासून शहरवासीयांना येत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी केव्हा मान्सून सक्रिय होतो, याची आतुरतेने वाट बघत आहे. 


बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ६७.३ मिमी पाऊस : बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी काही तालुक्यांमध्ये कमी तर काही ठिकाणी अधिक पाऊस झाला आहे. बुलडाणा, देऊळगावराजा, मलकापूर खामगाव, चिखली, मोताळा तालुक्यामध्ये आज २५ जून रोजी सायंकाळीही पावसाने हजेरी लावली. तर मेहकर, संग्रामपूर, जळगाव, नांदुरा तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. आतापर्यंत सरासरी ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खोळंबलेल्या पेरणीला सुरुवात केली आहे. 


यवतमाळात पावसाची दांडी 
यवतमाळ जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, सोमवार, २५ जून रोजी पाऊस येईल, असा कयास लावण्यात आला होता, परंतु दिवसभर पावसाचा थेंबही पडला नाही. आजही पावसाने दांडी मारली. मृग नक्षत्र संपून आता आर्द्र नक्षत्र लागले आहे. या नक्षत्रात पाऊस समाधानकारक होईल, अशी आशा सर्वांनाच आहे. असे असले तरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ढगांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात पाऊस आलाच नाही.

बातम्या आणखी आहेत...