Home | Maharashtra | Vidarva | Akola | Rally In city on afternoon; Adalanan back in night

शहरात दुपारी काढला माेर्चा; रात्री घेतले अांदाेलन मागे; भाजीपाला-फळांची अावक कायम

दिव्य मराठी | Update - Jul 28, 2018, 11:47 AM IST

मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम अांदाेलनाअंतर्गत शुक्रवारी दुपारी माेर्चा काढला.

 • Rally In city on afternoon; Adalanan back in night

  अकाेला- ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या (एअायएसटीसी) नेतृत्वाखाली मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम अांदाेलनाअंतर्गत शुक्रवारी दुपारी माेर्चा काढला. मात्र संध्याकाळी विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अांदाेलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अकोल्यात संघटनेच्या कार्यालयाबाहेर फटाके फाेडून जल्लोष करण्यात. दरम्यान भाजीपाला-फळांची अावक कायम असून खताचा साठाही मुबलक अाहे. जिल्ह्यात तब्बल ३० हजार ३७८ मेट्रिक टन एवढा साठा अाहे. अांदाेलनात अकोला डिस्ट्रिक्ट गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अाणि मोटर मालक संघटना सहभागी झाली हाेती.


  अकोला डिस्ट्रिक्ट गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात पुढील मागण्यांचा उहापाेह केला अाहे. यात डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात यावा, टाेल टॅक्स बंद करण्यात यावे, ई-वे बिलचे अाेझे ट्रांसपोर्टर्सवर लादू नये, ट्रान्सपोर्ट व्यवसायावरील टीडीएस संपुष्टात अाणण्यात यावे अादी मागण्यांचा समावेश हाेता. वाहतूक व्यवसायाच्या अडचणी, समस्या व मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने २० जुलै राेजी राष्ट्रव्यापी चक्का जाम अांदाेलन सुरु झाले हाेते.


  या मार्गाने काढला हाेता माेर्चा

  माल वाहतूकदारांचा माेर्चा कापडबाजारापासून प्रारंभ झाला हाेताे. डाॅ.. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय, या मार्गाने माेर्चा काढण्यात अाला. माेर्चात मालवाहतूकदारांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले हाेते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन सादर केले. देशभरातील ९२ लाख ट्रक सध्या उभे अाहेत. त्यामुळे या व्यवसायाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुळलेले १५ काेटी जण तूर्तास बेरोजगार झाले अाहेत, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले अाहे. याप्रसंगी अध्यक्ष मज़हर खान, सचिव जावेद खान, याकूब खान युनूस खान (अध्यक्ष- अकोला मोटर मालक संघ), अब्दुल गफ्फार शेख,कोषाध्यक्ष नटवरलाल पुरोहित, रंजीत सिंह ऊर्फ बबला सेठ, प्रकाश शर्मा,शब्बीर चाहवान, नासीर खान,सैयद बाबर,सुभाष भटाड, फारूक पहिलवान,अलयर खान,मो एज़ाज़,फिरोज़ साहिब,मो अनीस, जावेद खान,शेख हारून,मो युसूफ,फिरोज खान,अफजल साहेब,शेख नूर फौजी,रिजवान हुसैन, ईश्वर कटोरे अादी उपस्थित हाेते.


  वऱ्हाडातून शहरात भाजी-पाल्याची सुरू आहे अावक
  माल वाहतूकदारांचा एका अाठवड्यापासून संप सुरु असला तरी भाजीपाला व फळांची अावक कायम असून भावही स्थिर असल्याचे भाजी व फळ व्यावसायिकांचे म्हणणे होते. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार लहान गाड्यामंधून फळ व भाजीपाला बाजारात येत असून, इतरही वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून अावक झाली.. अकोल्यात वाशीम, बुलडाणा, अमरावती व अकाेला जिल्ह्यातून भाजीपाला येताे. या ठिकाणापासून अकाेला शहराचे अंतर कमी असल्याचे लहान वाहने लवकर पाेहाेचतात. त्यामुळे भाव स्थिर असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे हाेते.


  रॅकमधील खतही गाेदामात
  मालवाहतूकदारांचे अांदाेलन सुरु असतानाही रेल्वेने अालेले तीन रॅक खत गाेदामात नेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. पहिल्या रॅकमधील अायपीएलचे ३ हजार ९३७, दुसऱ्या रॅकमधील अारसीएफचे २ हजार ६००, तिसऱ्या रॅकमधील गुजरात स्टेटच्या ४ हजार ४८ मेट्रिक टन खताचा समावेश अाहे. यापूर्वीचा १९ हजार ७९३ मेट्रिक टन खताचा साठा अाहे. पहिल्या रॅकमधून अालेल्या ३९३७ मेट्रिक खतापैकी मागणी ३६८ ,तिसऱ्या रॅकमधून अालेल्या ४०४८ खतापैकी ५४७ मेट्रिक टन एवढीच मागणी हाेती. त्यामुळे मागणीपेक्षा जास्त खताचा साठा असल्याने शेतकऱ्यांना काळजीसारखे काही नसल्याचे अाकड्यावरुन दिसते.

Trending