आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाकू दाखवून शेतमजूर महिलेवर बलात्कार, अशी घडली दुष्कर्माची घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- चाकू दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी २० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील दुसरा अाराेपी घटनेपासून फरार अाहे. या खटल्यात न्यायालयाने अाराेपीला दंड ठोठावला असून, दंडातील ३१ हजार पिडीत महिलेला देण्याचा अादेशही न्यायालयाने दिला. यात पिडीत महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. हा अाराेपी विहिरीच्या कामासाठी शेतात अाला हाेता. मात्र त्याची महिलेवर वाईट नजर असल्याचे शेत मालकाच्या लक्षात अाल्याने त्याला हाकलून दिले हाेते. सामूहिक बलात्काराची घटना २८ फेब्रुवारी २०१६ राेजी बार्शिटाकळी तालुक्यात घडली हाेती. शंकर ऊर्फ शेखर देवराव मुंढे (राजंदा) हे शिक्षा सुनावलेल्या अाराेपीचे नाव अाहे. 


सिंदखेड शिवारातील शेतात धारणीचे कुटुंब (पती-पत्नी, तीन मुलांसह) शेती कामासाठी वास्तव्यास हाेते. विहिरीच्या कामासाठी ठेकेदाराने रांजदातील शंकर उर्फ शेखर देवराव मुंढेला बोलावले होते. ताे त्याचा मित्र आशिष उर्फ डुल्या श्रीकृष्ण कानपुरे (रा. राजंदा) सह शिवारात अाला. त्यांनी तेथील महिलेवर बलात्कार केला हाेता. शेतमालक शेतात अाल्यानंतर दाम्पत्याने घटनाक्रमाची माहिती दिली. शेतमालक, दाम्पत्याने बार्शिटाकळी ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुंढे, कानपुरे या अाराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय कोरचेंनी तपास करून दाेषाराेप पत्र न्यायालयात सादर केले. त्याची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात झाली. गुन्हा सिद्ध झाल्यानेे २० वर्षांची शिक्षा शुक्रवारी सुनावली. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आर. आर. ऊर्फ गिरीश देशपांडे यांनी युक्तिवाद केला. 


कुत्रा भुंकण्याच्या आवाजाने दाम्पत्य उठले
२८ फेब्रुवारी २०१६ रोजी पिडीत महिला ही दोन मुलांसह घरात झोपली होती. तिचा पती एका मुलासोबत ओसरीत झोपला होता. शेतशिवारत दुचाकीने शंकर मुंढे, त्याचा मित्र आशिष उर्फ डुल्या श्रीकृष्ण कानपुरे (रा. राजंदा) पाेहाेचले. त्यांनी दुचाकी रस्त्यावर उभी केली. हाेती. तेव्हा कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली. कुत्रा का भुंकतो, हे जाणण्यासाठी दाम्पत्य उठले. दरम्यान आशिष कानपुरेने महिलेच्या गळ्यावर चाकू लावला. त्यानंतर शंकर, आशिषने तिच्यावर अत्याचार केला. ते स्प्रे पंप, महिलेचा माेबाईल घेऊन पसार झाले होते. 


मानेवर हाेते चाकूचे निशाण
घटनेनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली. तिच्या मानेवर चाकूचे निशाण आढळले. पोलिसांनी चाकू, माेबाईल जप्त केला. 


अशी ठोठावली शिक्षा 
बलात्कारासह इतरही गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी शंकर मुंढे यास पुढीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. 
१. अत्याचार : २० वर्षांची सक्त मजुरी व २६ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात अाली. 
२. लुटून नेणे : पाच वर्षांची सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भाेगावी लागणार अाहे. 
३. जबरदस्तीने घुसणे : एक वर्ष सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे. 
अशी ठोठावली शिक्षा 
बलात्कारासह इतरही गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी शंकर मुंढे यास पुढीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. 
१. अत्याचार : २० वर्षांची सक्त मजुरी व २६ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात अाली. 
२. लुटून नेणे : पाच वर्षांची सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भाेगावी लागणार अाहे. 
३. जबरदस्तीने घुसणे : एक वर्ष सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे. 


१५ मार्च राेजी झाली अटक 
बलात्काराच्या घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून तपासाला प्रारंभ केला. पोलिसांनी अाराेपींचा ठावठिकाण शेाधण्यासाठी दाेन अाठवडे लागले. १५ मार्चला शंकर मुंढे यास अटक करण्यात पोलिसांना यश अाले. मात्र दुसरा आरोपी आशिष कानपुरे याला अटक करू शकली नाही. 


पीडितेला मिळेल रक्कम 
अाराेपीला ठोठावलेल्या ३२ हजार रुपयांच्या दंडातील एक हजार रुपये सरकार जमा हाेणार अाहेत. उर्वरित ३१ हजार रुपये रक्कम पीडितेला सानुग्रह राशी महणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आर. आर. ऊर्फ गिरीश देशपांडे यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...