आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी 2.22 कोटी रुपयांची मागणी करणार, अंतीम अहवाल राज्य शासनाकडे रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अंतीम अहवाल तयार झाला असून, त्यानुसार शासनाकडे २ कोटी २१ लाख ७९ हजार २२५ रुपयांची मागणी केली जाणार आहे. कृषी विभागाच्या प्रस्तुतीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने आज, मंगळवारी हा अहवाल शासनाकडे सादर केला.

 

गेल्या आठवड्यातील गारपीटीचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. त्यापैकी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण अहवाल कृषी विभागातर्फे एकत्रीत करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याच्या सातही तालुक्यातील २ हजार ७६० शेतकरी बाधित झाले असून एकूण बाधीत क्षेत्र १ हजार ८७७.३० हेक्टर आहे. यामध्ये बागायती आणि जिरायतीसह फळपिकांखालील क्षेत्राचाही समावेश अाहे. या एकत्रीत क्षेत्रासाठी शासनाकडून २ कोटी २१ लाख ७९ हजार २२५ रुपयांच्या अनुदानाची मागणी केली जाणार आहे. सर्वाधिक १ हजार ३२५ शेतकरी एकट्या तेल्हारा तालुक्याचे असून, त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला ५९ लाख ७ हजार ३७९ रुपयांची गरज आहे. अकोट आणि बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. अकोट तालुक्यातील ६३५ शेतकरी बाधित झाले असून, बाळापूरच्या ४७४ शेतकऱ्यांना गारपीटची झळ सहन करावी लागली. त्याखालोखाल अकोल्यातील ३२५ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात फक्त एका शेतकऱ्याचे नुकसान ३३ पेक्षा जास्त संवर्गात मोडत आहे. पातूर तालुक्याचा घोळही मिटला आहे.त्याचवेळी बार्शिटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील शेतीचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नाही, असे अहवालाचे म्हणणे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...