आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात साडे आठ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त; 7 आरोपी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर - सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या अॅटो रिक्षा व इतर वाहनामध्ये इंधन म्हणून गॅस भरणाऱ्या दोन जणांना बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून घरगुती व व्यावसायीक गॅस सिलेंडर ५२ नग, चार अॅाटो रिक्षा, एक अॅपे, दोन वीज मोटार, दोन काटे व इतर साहित्य असा एकुण ८ लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकासह सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई दि. २३ फेब्रुवारी रोजी शहरातील शिवाजी नगर व संत ज्ञानेश्वर नगरात करण्यात आली आहे.

 

शहरातील शिवाजी नगर व संत ज्ञानेश्वर नगरात घरगुती गॅस सिलिंडर मधून अवैधरित्या अॅाटो रिक्षा व इतर वाहनामध्ये इंधन म्हणून गॅस भरल्या जात असल्याची गुप्त माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहिती वरुन स्थागुशाचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्ष्क मनोज केदारे यांच्या पथकाने उपरोक्त नगरात धाड टाकली. यावेळी शिवाजी नगरात श्रावण पानसरे व संत ज्ञानेश्वर नगरात सतिश हरी वाघ हे दोघे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या अॅाटो रिक्षा व इतर वाहनामध्ये इंधन म्हणून गॅस भरून देत असल्याचे दिसून आले. तर याचवेळी इंधन भरण्यासाठी आलेले पाच अॅटो चालक प्रकाश दादाराव अाढाव, युवराज सुभाष वानखेडे, अशरफखॉ सखवत खॉ, बाळु पांडुरंग लोढे व विजय अंबाजी मोरे हे इंधन म्हणून वाहनात गॅस भरत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी घरगुती व व्यावसायीक गॅस सिलिंडरचे ५२ नग, चार अॅाटो रिक्षा, एक अॅपे, दोन वीज मोटार, दोन काटे व इतर साहित्य असा एकुण ८ लाख ३२ हजार २०० रुपयाचा माल जप्त केला. प्रकरणी पोलिसांनी उपरोक्त सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...