आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; शिवाजी, शाहू महाराजांचे विचार आत्‍मसात करण्‍याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - समाजातील जाती विषमता दूर होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी केले.


सहकारनगरातील शिवस्मारक समिती आणि शिवप्रेमींच्या वतीने आयोजित शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणप्रसंगी ते बोलत होते. संभाजीराजांच्या आगमनप्रसंगी सुवासिनींनी त्यांना आैक्षण केले. तुताऱ्या निनादल्या, फटाक्यांची आतषबाजी, संकल्प पथकाच्या ढोलाची थाप यामुळे इतिहासकालीन वातावरण तयार झाले होते. राजांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.

 

स्वराज्य सुराज्य व्हावे ही महाराजांची संकल्पना होती. केवळ मराठ्यांना घेऊन नाही तर हे राज्य अठरापगड जातींच्या लोकांचे आहे. त्यांना सोबत घेऊन महाराजांनी परकीय शक्तीशी लढा दिला. महापुरुषांचा विचार लोकांपर्यंत गेल्यास त्यांच्यामध्ये ऐक्य वाढीस लागेल, असे संभाजीराजे म्हणाले. ही भूमी शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकरांची आहे याचा विसर पडला का, याविषयी चिंतन झाले पाहिजे,असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...