आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​शिवशाही एसटी बसचा अपघात; दारुड्या चालकाला प्रवाशांनी दिला चोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरणखेड- अकोला येथून नागपूरला निघालेल्या एमएच ०९ ईएम १९७९ क्रं.च्या शिवशाही बसचा अपघात झाला. शुक्रवारी २७ एप्रिलला कुरणखेड येथील नवीन वस्ती बसस्टॉपजवळ गाडी रिव्हर्स आल्याने मागून येणाऱ्या प्रवासी ऑटोला धडक दिली. यामुळे ऑटोचा समोरील भाग चेपला. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांसह कुरणखेड ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. काही प्रवाशांनी गाडी व्यवस्थित चालवा, असे चालकाला म्हटले होते. त्यावर मी गाडी व्यवस्थित चालवतो, असे ड्रायव्हर वाहुरवाघ यांनी म्हटले. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. या अपघाताने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान मूर्तिजापूर डेपोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची प्रवासाची व्यवस्था केली. पोलिसांना घटनेची माहिती देऊनही ते पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिकांना नाराजी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...