आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्यातील सहा जणांना निळू फुले स्मृती पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात निःस्वार्थ व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या, कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. २०१० पासून सुरू असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यंदा उत्कर्ष शिशुगृह, पिंजरचे दीपक सदाफळे, प्रा. डॉ. अनिरुद्ध खरे, समर्पण प्रतिष्ठानचे अमोल मानकर, हास्य कवी अरविंद भोंडे, सिने दिग्दर्शक नीलेश जळमकर, ऐश्वर्या तापडीया यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 


आजपर्यंत ८५ अनाथ बालकांना आईबाबा व वैभव मिळवून देणाऱ्या उत्कर्ष शिशूगृह यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले समाज वैभव पुरस्कार' देण्यात येणार आहे. पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अध्यक्ष दीपक सदाफळे यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले समाजभूषण पुरस्कार' तर समर्पण फाउंडेशनचे संस्थापक संचालक अमोल मानकर यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले समाजव्रती पुरस्कार' देण्यात येणार आहे. संगीततज्ज्ञ, सीताबाई कला महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिरुद्ध खरे यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले कला भूषण पुरस्कार', हास्य कवी अरविंद भोंडे यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले कला गौरव पुरस्कार', युवा नाट्य, सिने दिग्दर्शक, पटकथा, संवाद लेखक नीलेश जळमकर यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले सिने भूषण पुरस्कार' आणि युवा अभिनेत्री ऐश्वर्या तापडीया यांना 'नटश्रेष्ठ निळु फुले नाट्य चेतना पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहे. नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाऊंडेशनचे मार्गदर्शक नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, गझल नवाज भीमराव पांचाळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा उद्योजक गोपाल खंडेलवाल यांच्या संमतीनुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अॅड. नितीन धूत, सचिव सुधाकर गिते, स्वागताध्यक्ष प्रशांत फुलारी, विजय मोहरीर, कोषाध्यक्षा ज्योती भिडे, शोभना ठाकरे हे काम पाहत आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रामगीता असे असून, दिमाखदार सोहळ्यात या सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...