आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू-सासऱ्याचे टोमणे जिव्हारी लागल्याने जावयाने केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नोकरीही नाही, काही काम शोधत नाही, म्हणून सासू व सासरे जावयाला टोमणे मारत असत, त्यांच्या अवमानास्पद वागणुकीला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा खुलासा जावयाने मृत्यूपूर्व काढलेल्या व्हिडिओतून समोर आला. नागेश हरीनाथ पारसकर असे त्या जावयाचे नाव आहे. नागेश पारस्कर यांनी २४ जूनला कुंभारी रोडवरील कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक नागेशचा भाऊ शिवचरण हरीनाथ पारस्कर (जुना अंदुरा, ता. बाळापूर)यांनी एमआयडीसी पोलिसांना मृत्यूपूर्व व्हिडिओ दिला व पोलिसांत तक्रार दिली. त्यात त्याने म्हटले की, 'माझा भाऊ नागेशचा विवाह २०१३ मध्ये मराठानगर कुंभारी येथील नवनाथ येवले यांची मुलगी जयश्रीशी झाला होता. सुरुवातीला दोन वर्ष ते अंदूरा येथे राहिले; परंतु माझी वहिनी तेथे राहत नव्हती. म्हणून ते दोघे पुण्याला राहण्यास गेले होते. त्यांना दोन मुले आहेत. पुण्यात राहताना माझी वहिनी तिच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून माझे भावाला कुंभारी येथे राहण्यासाठी जाण्याचा तगादा लावत होती. अखेर त्यांचे कुटुंब कुंभारी येथे १९ जूनला राहण्यासाठी आले होते.दरम्यान भाऊ नागेश एमआयडीसीत काम शोधत होता. त्याला कामाच्या कारणावरून त्याची सासू पुष्पा येवले व सासरा नवनाथ येवले हे टोमणे मारत होते. त्यामुळे माझा भाऊ दडपणाखाली होता. २४ जून रोजी माहिती मिळाली की, भावाने कुंभारी-बाभुळगाव रोड वरील कडुलिंबाचे झाडाला दुपटयाने गळफास घेवुन आत्महत्या केली. 


मृत्यूपूर्व काढलेल्या व्हिडिओत जावई रडला.. 
अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतक नागेशचा मामेभाऊ रवी गजेंद्र तिहिले (रा.भांबेरी ता.तेल्हारा) याने नागेशने मोबाइल वरुन मृत्यूपूर्व पाठवलेला व्हिडिओ शिवचरणला दाखवला. त्या व्हिडिओत नागेश म्हणतो, कुंभारी येथील आपले सामान अंदुरा येथे घेवून जा. माझे घरात काही चालत नाही. सासू पुष्पा येवले व सासरा नवनाथ येवले यांच्याविरुद्ध पोलिसांत रिपोर्ट द्या, असे म्हणून रडत होता. या व्हिडिओची सीडी शिवचरणने पोलिसांना दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...