आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीय वर्षात प्रवेश मिळाला नाही म्हणून विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद- एका विद्यार्थ्याने येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजीच्या व्दितीय वर्षाची परीक्षा दिली होती. परंतु, त्याला तृतीय वर्षात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत सापडल्यामुळे त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २० जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवारात उघडकीस आली आहे. 


मलकापूर तालुक्यातील घीर्णी बेलाड येथील ऋषिकेश कैलास वानखेडे याने कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजीच्या व्दितीय वर्षाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १९ जुलै रोजी लागला. यात ऋषीकेशला चार विषयात डिसी मिळाला होता. दरम्यान आज दुपारी बारा वाजेपर्यंत तो कॉलेजमध्ये होता. मित्रासोबत जेवण केल्यानंतर तो दुपारी एक वाजता कोणालाही न सांगता निघून गेला होता. शोध घेतला असता त्याचा मृतदेह जळगाव जामोद शिवारातील विहिरीत आढळून आला. प्रकरणी मृतक विद्यार्थ्याचे नातेवाईक दिलीप मनसुटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय अरुण किकरडे व माधव कुटे हे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...