आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थ म्हणाले, रस्ताच नाही; दुर्घटना घडल्यास जबाबदारी काेणाची ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- काेळंबी-पातूर नंदापूर-साेनखास रस्त्याच्या दुरवस्थेवरून साेमवारी विद्यार्थी व पालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची शाळाच कार्यकारी अभियंत्याच्या कक्षात भरली. ग्रामस्थांनी ठिय्या अांदाेलन केले. रस्ताच नसून, माेठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी काेणाची राहिल, असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी रस्त्यावर खड्डे पडल्याचे सांगत ३ जुलैपासून दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ हाेईल, असे लेखी अाश्वासन दिले. त्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात अाले. तत्पूर्वीच विद्यार्थ्यांनी अभियंत्यांच्या कक्षात फराळ केला. 


काेळंबी-पातूर नंदापूर-साेनखास रस्त्याचा मुद्दा यापूर्वी नियाेजन समितीच्या सभेत गाजला हाेता. जि.प.सदस्या प्रतिभा प्रभाकर अवचार यांनी हा मुद्दा उपस्थित केला हाेता. २ जुलै ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रार दिली. त्यानंतर विद्यार्थी व ग्रामस्थांनी थेट सा.बां.विभागात धाव घेत अभियंत्यांना जाब विचारला. ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चाैहान यांना निवेदन दिले. याप्रसंगी प्रतिभा अवचार, भारिप-बमसंच्या प्रा. मंतोष मोहोड, गजानन गवई यांच्यासह,सुनील ठाकरे, पंजाबराव मुळे, प्रल्हाद ठोंबरे,पंकज मुळे, पुरुषोत्तम राऊत, संदीप मुळे, उल्हास सदांशीव, पांडुरंग मुळे, सुधीर राऊत, दिनेश मुळे, अवधुत राऊत, विठ्ठल लाटे, राजु ठोंबरे, विकास सदांशिव,सतीश चोपडे,राजेश लाखे,सतीश उभे, सरपंच महेंद्र इंगळे, माणिक टोबरे विद्यार्थी किरण वानखडे, समृद्धी आठवले, काजल ठोंबरे, नयना राऊत , ऐश्वर्या आठवले, शिवानी भोगे, वर्षा मोहिते, आचल पवार, राणी बडवे, मेघा मुंगुलकर, वैष्णवी मुंगुलकर, पूनम ढिसाळे, रेणुका ढवळे, विकी मोहीते, मनीष इंगळे, आशिष इंगळे, रुपेश खोकले, स्वप्निल ढिसाळे,रोहन राऊत,सुरज ओळंबे,सौरभ सोनोने,दिपवंश वानखडे अादी उपस्थित हाेते. 


अभियंत्यांना धरले धारेवर
रस्त्याबाबत ग्रामस्थ व भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात घडल्यास काेण जबाबदार राहील. असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर अभियंत्यांनी अापण जबाबदारी घेऊ, असे सांगत कंत्राटदाराची माहिती सांगण्यास सुरुवात केली. यावर भारिपचे नेते गजानन गवई यांनी दिशाभूल करु नका, असे म्हणत रस्त्याअभावी शाळा बंद ठेवायची काय, असा सवाल केला. तसे असल्यास लेखी द्या, अशीही मागणी त्यांनी केली. शासन निर्णयानुसार काम का नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर मुरूम टाकण्याचे, दबाईचे काम मंगळवारपासून सुरु हाेईल. दाेन दिवसांनी मी स्वत: पाहणी करताे, असे कार्यकारी अभियंता चाैहान यांनी सांगितले. तसेच हा रस्ता फेब्रुवारीपर्यंत पूर्ण हाेईल, अशीही ग्वाही चाैहान यांनी दिली. 


असा अाहे रस्त्याचा खर्च 
काेळंबी-पातूर नंदापूर साेनखास हा १५ कि.मी.चा रस्ता अाहे. पातूर ते काेळंबी या १२ कि.मीच्या रस्त्यासाठी ३ काेटी मंजूर झाले असून, काम सुरु हाेणार अाहे. पातूर ते साेनखास या ३ कि.मी.च्या रस्त्यासाठी ८० लाख मंजूर झाले . मात्र ही हे काम सुरु झालेले नाही. पातूर नंदापूरला सरस्वती विद्या मंदिर, ग्रामविकास विद्यालय, जि. प. शाळा अाहेत. 


असे अाहेत अाक्षेप
काेळंबी-पातूर नंदापूर साेनखास रस्त्याबाबत जि.प.सदस्या प्रतिभा अवचार यांनी कार्यकारी अभियंत्यांनाही पत्र दिले. सर्वाधिक दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या (त्या बाजूने) दुरुस्ती हाेणे अावश्यक हाेते. मात्र हे काम न करता तुलनेने चांगला असलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरु करण्यात येणार अाहे. ही बाब साेनखास येथील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी अाहे. हा रस्ता १५ वर्षांपासून दुरुस्त करण्यात अालेला नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले. 


अभियंता चाैहान म्हणाले 'साॅरी' 
रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना बांधकाम विभागात अाल्याचे पाहून कार्यकारी अभियंता चाैहान विद्यार्थ्यांकडे पाहत 'साॅरी' म्हणत खंत व्यक्त केली. तत्पूर्वी जि.प. सदस्या प्रतिभा अवचार यांनी रस्त्यामुळे दाेन विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी या संबंधित दाेन विद्यार्थिनींनाही कार्यकारी अभियंत्यांसमाेर उभे केले. ग्रामस्थांनी अभियंत्यांना रस्त्याच्या दुरवस्थेचे छायाचित्रेही दाखवली. 

बातम्या आणखी आहेत...