Home | Maharashtra | Vidarva | Akola | Superintendent of Police M. Rakesh Kalasagar

'साहेब, धंदे सोडले हो..आता नका,'अशा विनवणीची बदमाशांवर वेळ

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 11:50 AM IST

धार्मिक सण व उत्सवाच्या धर्तीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची रंगीत तालीम पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक एम.

  • Superintendent of Police M. Rakesh Kalasagar

    अकोला- धार्मिक सण व उत्सवाच्या धर्तीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची रंगीत तालीम पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील निगराणी बदमाश तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना एलसीबीमध्ये हजर केले. या वेळी त्यांना चांगलाच दम भरला. यामध्ये गुन्हेगारी पृष्ठभूमी असणाऱ्या व पांढरे शुभ्र कपड्यात वावरणाऱ्या काही राजकीय नेते-कार्यकर्त्यांचा समावेश होता. मवाळ स्वभावाने परिचित असलेल्या पोलिस अधीक्षकांचा रुद्रावतार पाहून अनेकांना दरदरून घाम फुटला. तर अनेकांवर 'साहेब आता धंदे सोडले हो' अशी विनवणी करण्याची वेळ आली. पुन्हा एकदा उर्वरित बदमाशांची परेड होणार असल्याने गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे.


    पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी ठाणेदारांना त्यांच्या हद्दीतील निगराणी बदमाशांना हजर करण्याचे फर्मान सोडले. एसपीसाहेब काही सूचना देतील म्हणून ठाणेदारांनी निगरानी बदमाशांना निरोप धाडले व त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत पोलिस अधीक्षकांसमोर हजर केले. या वेळी पोलिस अधीक्षकांनी सर्व गुन्हेगारांची हजेरी घेतली व त्यांना तंबी देत त्या त्या हद्दीतील ठाणेदांनाही त्यांचा चांगलाच समाचार घ्यायला लावला. त्यामुळे ठाणेदारांच्या शब्दावर जे हजर झाले होते. त्यांचा समाचार घेताना काही ठाणेदारांची कोंडी झाल्याची चर्चा आहे. गुन्हेगारी पृष्ठभूमी असणाऱ्यांची पुन्हा एकदा अशीच हजेरी होणार असल्याने गुन्हेगारांत कावडयात्रा, गणेशोत्सव व बकरी ईद या धार्मिक सण उत्सवाच्या काळापर्यंत पोलिस अधीक्षकांचा समाचार विसरणार नाहीत, एवढे निश्चित. गुन्हेगारांची हजेरी घेताना उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील व गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते.


    अडचण काही स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची
    शहरात काही स्थानिक पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. काही का होईना यातील काही अधिकाऱ्यांचे शहरात संबंध असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करताना त्यांच्यासमोर अडचणी येतात. त्यामुळेच पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या हातून त्यांच्याच हद्दीतील गुन्हेगारांचे कान उपटून पोलिस हा सज्जनांच्या रक्षणासाठी तर दुर्जनाच्या विनाशासाठी असतो हे मात्र आपल्या कृतीतून दाखवून दिले.

Trending