आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरी बसच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू; दुर्घटनेत दुसरा शिक्षक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शाळेत जाणारे शिक्षकांच्या दुचाकीला भरधाव लक्झरीने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोनपैकी एक शिक्षक जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी ७ जुलैला सकाळी साडेसहा वाजता न्यायालयासमोर घडला. केळीवेळीजवळ असलेल्या काटीपाटी या गावातील शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

संजय नारायण हिवरे (रा. खोडके हॉस्पिटलच्या मागे, जठारपेठ चौक), काशीनाथ अंबलकर हे दोघेही नेहमीप्रमाणे दुचाकी क्रं. एमएच ३० एडी ५४५२ ने शाळेत जात होते. दरम्यान शहरातील रेल्वे स्थानक चौकापासून जवळच न्यायालयासमोर ते आले असता, त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या लक्झरी क्र. एमपी ४८ पी ११०० ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील संजय हिवरे हे शिक्षक जागीच ठार झाले. तर त्यांच्या पाठीमागे बसलेले शिक्षक काशीनाथ अंबलकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रामदास पेठ पोलिसांनी याप्रकरणी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, संजय हिवरे यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला होता.

 

बातम्या आणखी आहेत...