आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाला कारावास; वही तपासणीच्या उद्देशाने बाेलावले हाेते वर्गामध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - गुरू-शिष्य या पवित्र नात्याला काळिमा फासून विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाने तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षकाने विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची वही तपासण्यासाठी बोलावले हाेते. संजय सखाराम गोपनारायण (४५, रा. आपोती खुर्द, ह. मु. कोठारी वाटिका -४) असे शिक्षा सुनावण्यात अालेल्या शिक्षकाने नाव अाहे.

 

विनयभंगाची घटना बाेरगाव मंजू पाेलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आपोती खुर्द येथील शाळेमध्ये १३ फेब्रुवारी २०१५राेजी घडली हाेती. इयत्ता ९वीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेतून घरी गेली. मात्र मजुरी करून घरी परतलेल्या तिच्या वडिलांनी तिला रडण्याचे कारण विचारले. तिने शाळेत घडलेला प्रसंग अाई-वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात १४ फेब्रुवारी २०१५ रोजी पालकांनी बोरगाव मंजू पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नंतर तपास केल्‍यानंतर न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

बातम्या आणखी आहेत...