आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे अांदोलन: शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात दिला ठिय्या, 6 महिन्यांचे वेतन रखडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - सहा महिन्यांचे वेतन रखडल्याने जिल्ह्यातील ३०० खासगी प्राथमिक शिक्षकांनी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शनिवारी(दि.३) थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. शिक्षक अाक्रमक झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्यामुळे पाेलिसांनी शिक्षण विभागात धाव घेत 'येथे अांदाेलन करणे नियमबाह्य अाहे,' असे शिक्षकांना उद्देशून सांगितले. यावर शिक्षकांनीही अाक्रमक पवित्रा घेत 'येथे नाही तर, कुठे अांदाेलन करायचे', असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर शिक्षकांनी लाेकप्रतिनिधींशी माेबाईल फाेनवर संवाद साधला. अखेर ही बाब पुणे येथील शिक्षण संचालकांपर्यंत पाेहाेचल्याने शिक्षकांना पुढील अाठवड्यात चर्चा करण्यासाठी बाेलवले. त्यामुळे तुर्तास अांदाेलन स्थगित करण्याचा निर्णय शिक्षक संघाने घेतला.

 

जिल्ह्यातील प्लनअंतर्गत वेतन हाेणाऱ्या ३०० शिक्षकांचे ६ महिन्यांचे वेतन रखडले अाहे. या वेतनासाठी २ काेटींची अावश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. याबाबत शिक्षकांनी वेतन पथक अधीक्षकांच्या (प्राथमिक) कार्यालयाकडेही पाठपुरावा केला. मात्र पुणे येथील संचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध हाेत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकत असल्याचे लक्षात येताच शिक्षणाधिकाऱ्यांच्याच कक्षात ठिय्या अांदाेलन करण्यात अाल्याचे राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनीष गावंडे यांनी सांगितले. शिक्षकांचे केवळ वेतनच नाही, तर वैद्यकीय व एरीयस देयकेही ८ महिन्यांपासून रखडली अाहेत. निधीच उपलब्ध नसल्याने देयके रखडली आहेत. या अांदाेलनात मनीष गावंडे, मेरसिंग अाझडे, बालाजी मुरमुरे, जावेद खान, सुनील चव्हाण, साधना उंबरकर, निकिता तायडे, गायत्री उजाडे, संगिता शिंगाेकार, विशाला अागाशे, विवेक खंडेराव, विजय चव्हाण,प्रशांत घुगे, अनिल चव्हाण, राजन लाेखंडे, याेगेश घाटाेळ, उमेश राठाेड, अाशिच चव्हाण, संदीप लाेखंडे, शुभांगी घाेटे, संदेश अरबाड, माे. वाजिद, साेहेल अफजाल, माे. फैय्याज, कैलास राठाेड, जुबेर माे., माे. माजिद साजीद, सुवर्णा वराेकार, अब्दुल नईम, सईद खान हुसेन खान, शेख सलिम शेख बन्नू अादी सहभागी झाले हाेते.

 

पोलिसांकडून अांदाेलन दडपण्याचा प्रयत्न : अनेकदा विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटनांकडून जिल्हा परिषदेत तीव्र अांदाेलन करण्यात येते. काही संघटनांनी तर थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या अांदाेलन करणे, अधिकाऱ्यांना बेशरमचे झाड भेट देणे, अधिकाऱ्यांना बांधण्यासाठी दाेरखंड साेबत घेत घाेषणाबाजी करण्यासारखे प्रकार घडले अाहेत. अशा वेळी तेथे उपस्थित असलेल्या पाेलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली हाेती. मात्र शनिवारी शांततेच्या मार्गाने अांदाेलन करणाऱ्या शिक्षकांना पाेलिसांनी थेट धारेवर धरण्याचा प्रकार केला. एकूणच पाेलिसांनी सर्वच अांदाेलकांबाबत एकसारखी भूमिका का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहे.

 

लाेकप्रतिनिधींशी साधला संवाद: पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री डाॅ. पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, अा.बच्चू कडू, निरंजन डावखरे, दत्ता सावंत यांच्याशी संपर्क साधला. लाेकप्रतिनिधी शिक्षण संचालकांशी बोलले.अखेर संचालकांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावल्याने आंदाेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...