आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन बदल्यांचा घोळ, शिक्षकांचा अांदाेलनाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - प्राथमिक शिक्षकांच्या अाॅनलाइन बदली प्रक्रियेबाबत बुधवारी शिक्षकांनी प्रथम जिल्हा परिषदेत धाव घेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर कर्मचारी भवन येथे जमा हाेत अांदाेलनाचा निर्णय जाहीर केला. या बदली प्रक्रियेतील घाेळ थांबण्याचे नावच घेत नसून, मंगळवारी ३७७ सुधारित अादेश जारी केले गेले. त्यामुळे यंत्रणांचा सावळा गाेंधळ शिक्षकांच्या मुळावर उठल्याचा अाराेप अाहे.

 

जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या १७५४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी अद्यापही प्रसिद्ध न केल्याने अन्याय झाला असून, संवर्ग १ व २ मधील शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली करण्यात अाल्याचा अाराेप शिक्षकांनी केला अाहे. त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. या वेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. आॅनलाइन प्रक्रियेत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक होते. या बाबींकडे पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असे शिक्षकांचे म्हणणे अाहे. शिक्षकांनी केलेल्या दाव्यातील खरेपणाही तपासण्यात आला नाही. त्यामुळे इतर पात्र शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

 

विषय शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी: शिक्षक संघटना समन्वय समितीने घेतलेल्या बैठकीत विषय शिक्षकांच्या नियुक्त्या तातडीने करा, त्यांची पदे विस्थापित शिक्षकांसाठी खुली करा, या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. विस्थापित शिक्षक आणि उपलब्ध जागांमध्ये तफावत आहे. ५०० पेक्षाही अधिक विस्थापित शिक्षकांसाठी ५९ जागा उपलब्ध आहेत. उर्वरित ४५० पेक्षाही अधिक शिक्षकांच्या पदस्थापनेचा वांधा होणार आहे. विषय शिक्षकांची पदे बदली पोर्टलवर खुली करावी, या मागणीचे निवेदन समन्वय समितीने दिले. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी शशिकांत गायकवाड, प्रकाश चतरकर, नामदेव फाले, देवानंद मोरे, जव्वाद हुसेन, प्रमोद मोकळकर, राजेश देशमुख, शंकर तायडे, मंगेश देशपांडे, रजनीश ठाकरे, टी.एन. मेश्राम, शैलेंद्र गवई, शाम कुलट उपस्थित होते.


अशा झाल्या बदल्या
झेडपी १७५४ प्राथमिक शिक्षकांच्या अाॅनलाइन बदल्या झाल्या हाेत्या. यात अकाेला -२३६, अकाेट-२१८, बाळापूर-१६८, बार्शिटाकळी-२२३, मूर्तिजापूर-२९०, तेल्हारा पं.स.अंतर्गत १६८ सहाय्यक शिक्षकांच्या बदल्या केल्या हाेत्या.

 

... तर न्यायालयात धाव घेणार
शिक्षकांनी िजल्हा परिषद कर्मचारी भवन येथे धाव घेतली. त्यानंतर लवकरच धरणे अांदाेलनाचा निर्णय घेण्यात अाला. तरीही मागण्या मंजूर न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात अाला.

 

 

बातम्या आणखी आहेत...