आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला-धुळे जिल्हयातील दाेंडाईचा येथील शाळेत पाच वर्षाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील अाराेपींना कठाेर शिक्षा व्हावी, यासाठी तेली समाज कृती समितीतर्फे जनअाक्राेश मुक माेर्चा काढणार अाहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात अाली. माेर्चात ३ हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी हाेणार असल्याचा दावा अायाेजकांनी केला.
तेली समाजाच्या िचमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे समाजात अाक्राेश निर्माण झाला अाहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी अाहे. या अमानवीय घटनेने समाज पेटून उठला अाहे. लैंगिक शाेषण करणाऱ्या नराधमांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना फासावरच चढवणे अावश्यक अाहे. यासाठी समाजबांधव, मातृशक्ति, युवशक्तिने एकजूट दाखवून जनअाक्राेश माेर्चात सहभागी व्हावे, असे अावाहन तेली समाज कृती समितीने केले . पिडीत कुटुंबीयांना अार्थिक मदत केल्याचेही समितीतर्फे सांगण्यात अाले.
असे अाहे प्रकरण
धुळे जिल्हयातील दोंडाईचा येथील नतून हायस्कूल या खासगी खासगी शाळेत तेली समाजाच्या पाच वर्षाच्या विद्यार्थिनीवर काही नराधमांनी बलात्कार केला हाेता. ही घटना ८ फेब्रुवारी राेजी घडली हाेती. चाॅकलेटचे अामिष दाखवून नराधमांनी या िवद्यािर्थनीवर अत्याचार केले हाेते. अत्याचाराची बाब तिच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी प्रथम तिच्यावर उपचार व्हावेत, यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र शाळेच्या काही संचालकांनी हस्तक्षेप केल्याने तिच्यावर रुग्णालयातही उपचार हाेऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी जळगाव येथे राहत असलेल्या अापल्या नातेवाइकांकडे धाव घेतली. तेथेच तिच्यावर उपचार करण्यात अाले. त्यानंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी जळगाव पोलिसात धाव घेतली. जळगाव पोलिसांनी कारवाई करुन गुन्हा दोंडाईचा पोलिसांकडे वर्ग केला हाेता.
अशी सुरु अाहे तयारी
माेर्चासाठी तयारी करण्यात येत अाहे. समाजात जागृती व्हावी, यासाठी जवळपास १०० गावांमध्ये बैठका घेणार अाहेत. बैठकांचे सत्र सुरुही झाले अाहे. माेर्चा िशस्तबद्धपद्धतीने निघावा, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध समित्या स्थापन करणार अाहेत, असेही तेली समाज कृती समितीतर्फे सांगण्यात अाले.
तेली समाज कृती समितीच्या या अाहेत मागण्या
बलात्कार प्रकरणातील खऱ्या अाराेपींना अटक हाेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा, यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या प्रकरणातील अाराेपींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे आणि अत्याचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्व संबंधितांना कठाेर शिक्षा व्हावी, यासाठी २३ मार्च राेजी जनअाक्राेश माेर्चा काढण्यात येणार अाहे. माेर्चा सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशनराेडवरील अकाेला क्रिकेट क्लब मैदानावरून निघेल. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करणार अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.