आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शाखाधिकाऱ्यास अखेर अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- पीक कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे यास पोलिसांनी सोमवारी नागपूर जिल्ह्यात अटक केली. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेत एक शेतकरी त्याच्या पत्नीसह पीक कर्जाच्या मागणीसाठी गेला असता शाखाधिकारी राजेश हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीस शरीर सुखाची मागणी केली होती. 


यासंदर्भात पीडित महिलेने मोबाइलवरील त्याचे संभाषण रेकॉर्ड करून तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बँकेचा शाखाधिकारी हिवसे व त्याला साथ देणारा शिपाई मनोज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यातील शिपाई मनोज चव्हाण यास पोलिसांनी अटक केली. तर शाखाधिकारी हिवसे फरार होता. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक यांनी दोघांनाही निलंबित केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...