Home | Maharashtra | Vidarva | Akola | theft in house; women batain

चड्डी बनियनधारी टोळीचा धुमाकूळ; घरात घुसून महिलेला केली मारहाण

प्रतिनिधी | Update - Jul 30, 2018, 12:18 PM IST

चड्डी बनियानधारी दरोडेखोरांनी रविवारी पहाटे ३ वाजता बाळापूर तालुक्यातील पारस येथील घरांमध्ये दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घ

 • theft in house; women batain

  अकोला- चड्डी बनियानधारी दरोडेखोरांनी रविवारी पहाटे ३ वाजता बाळापूर तालुक्यातील पारस येथील घरांमध्ये दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घराचे दार तोडून महिलेला ताब्यात घेतले व मारहाण करून धाकावर कपाटाच्या किल्ल्या घेतल्या. कपाटातील एक किलो चांदीचे तर चार तोळे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह १२ हजार रुपये लुटून नेले. तत्पूर्वी दरोडेखोरांनी दोन घरांमध्ये दरोड्याचा प्रयत्न केला. या घटनेने पारसमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


  पारस येथील रेल्वे स्टेशन चौकातील गजबजलेल्या परिसरात प्रेमलाल यादव यांचे घर आहे. २९ जुलै रोजी रविवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून तीनजण आत घुसले. वरच्या मजल्यावरील खोलीत प्रेमलाल यादव यांचा मुलगा विनोद झोपला होता. दरोडेखोरांनी त्याच्या खोलीचे दार बाहेरून बंद करून त्याला कोंडून घेतले व प्रेमलाल व कलावती झोपलेल्या खालच्या खोलीत तिघे जण शिरले. खळबळून उठलेल्या यादव दाम्पत्यांना त्यांनी मारहाण केली. कपाटाचे कुलूप उघडण्यासाठी त्यांनी कलावती यांना किल्ली मागितली. त्यांनी देण्यास नकार दिला असता त्यांना लोखंडी रॉडने मारहाण सुरु केली. जीवाच्या आकांतापोटी अखेर त्यांनी किल्ल्या काढून दिल्या. नंतर कपाट उघडून त्यानंतर यादव पती-पत्नीस धमकावून कपाटातील अर्धा किलो वजनाचा चांदीचा कंबरपट्टा, अर्धा किलोची एक चांदीची लच्छी, २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक १० ग्रॅम वजनाची गळ्यातील चैन, मंगळसूत्र, डोरले व ३० मणी, ३ ग्रॅम वजनाचे २ झुमके व नगदी १२ हजार लुटून नेले.


  चड्डी बनियानधारी असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
  बाळापूर पोलिस ठाण्यात लुटारुंविरुद्ध भादंवि कलम ३९४ नुसार कलावती यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दोघेजण चड्डी बनियान परिधान करून असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


  यादव यांच्या घराला लक्ष्य करण्यापूर्वी दोन ठिकाणी प्रयत्न
  दरोडेखोरांनी रात्री २ वाजता शिक्षक कॉलनीमध्ये रहिवासी सुरक्षा रक्षक बोरे यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पोलिस कॉन्स्टेबल जंगबहादूर यादव यांच्या घराकडे वळवला. घराचे लोखंडी फेन्सिंग कापत असताना यादव यांच्या कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली असता यादव यांना जाग आली. त्यांनी पाच दरोडेखोरांना पळताना पाहिले.

Trending