आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी गेलेल्या मोबाइलसह चोरटे ताब्यात; १९ मोबाइल केले परत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिव्हिल लाइन ठाण्यात तकरादारांना मोबाइल परत करण्यात आले - Divya Marathi
सिव्हिल लाइन ठाण्यात तकरादारांना मोबाइल परत करण्यात आले

अकोला- मोबाइल चोरी झाला किंवा हरवला तर तो परत मिळेल अशी आशाच नसते. मात्र मोबाइलचा गैरवापर होऊन अडचणीत येऊ नये, म्हणून तक्रार करण्यात येते, अशाच तक्रारी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी निकाली काढल्या. सायबर ठाण्याची मदत घेऊन १९ मोबाइलचा छडा लावण्यात यश आले असून सर्व मोबाइल संबधितांना रविवारी परत केले. 


धर्मेश सर्जेकर, भास्कर बोरकर, पलक खंडेलवाल, प्रवीण सरदार, सिद्धार्थ कांबळे, नीलेश देवा, रुनझून मोडक, वैभव सोरटे, मंगेश तायडे, नाना पवित्रकार, एकनाथ राजगुरू, अतुल पुरुषे, नरेंद्र कोठाले, विजय साळवे, अंकिल मोडक, लकी डोंगरे, प्रकाश देशमुख, संदीप पंचभाई, अमितदास सुबोधदास यांनी सिव्हिल लाइन्स ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून ठाणेदार अन्वर एम. शेख यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या सहाय्याने मोबाइल ट्रेसिंगवर टाकले. संबधित कंपन्यांकडून मोबाइलचे लोकेशन त्यात ज्यांनी सीमकार्ड टाकून वापर केला त्यांचे नाव,पत्ते सायबर ठाण्याला पाठवले. त्यानंतर त्या मोबाइलचा शोध लावण्यात यश आले. ठाणेदार अन्वर एम. शेख, सहायक निरीक्षक विशाल नांदे व सुनील सोळंके यांनी हरवलेले मोबाइल परत केले.

बातम्या आणखी आहेत...