Home | Maharashtra | Vidarva | Akola | thieves gang arrested in akola

महामार्गावर लूटणारी सशस्त्र टोळी 'एलसीबी'च्या जाळ्यात, गुन्हा कबुली

प्रतिनिधी | Update - Jul 30, 2018, 12:22 PM IST

राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी जेरबंद केली.

  • thieves gang arrested in akola

    अकोला- राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी जेरबंद केली. अटक केलेल्या चाैघांंनी गुन्ह्याची कबुली दिली.


    २६ डिसेंबर २०१७ रोजी अक्षय किशोर पाटील (वय १८, मोहन भाजी भांडारजवळ तापडिया नगर) हा युवक दुचाकीने हिंगणा येथील पुलाजवळ अकोला बायपास रोडने संध्याकाळी सव्वासात वाजताच्या दरम्यान शेगावला दर्शनाकरीता जात होता. या वेळी चार लुटारूंनी त्याची दुचाकी अडवली. एकाने त्याची कॉलर पकडली व त्याला रोडचे बाजूला नेले. युवकाला चाकू दाखवून थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपीने दुसऱ्याने हातातील सोन्याची अंगठी काढून खिशातील ३० हजार रुपयांचा मोबाइल फोन व पाकिटातील ८०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर भेदरल्याने युवकाने पोलिसांत तक्रारच दिली नाही. मात्र त्या युवकाला लुटारू पुन्हा नजरेस पडले व त्याने ते ओळखले. त्यावरून त्याने २५ जुलैला जुने शहर ठाण्यात तक्रार दिली.


    पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे यांनी हाती घेतला. त्यासाठी त्यांनी पीएसआय रणजितसिंह ठाकूर, पोकॉ. जितेंद्र हरणे, गणेश पांडे, शंकर डाबेराव, शक्ती कांबळे, अमित दुबे, मनोज नागमते, मंगेश मदनकार यांचे पथक गठित केले. या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासातच संशयावरून इम्रान अली उर्फ सद्दाम सय्यद अली (वय २४, रा. शाहबाबू कॉलेज जवळ हमजा प्लॉट अकोला), शाहरूख अली सैय्यद अली (वय २४, रहिमभाईच्या चक्की जवळ हमजा प्लॉट), सैय्यद नाजिमउद्दीन सैय्यद रहिमोद्दीन (वय १९, शाहबाबू कॉलेज जवळ हमजा प्लॉट) व सैय्यद अकिब सैय्यद अयुब (वय २० वर्ष रा. मोहम्मद अली मज्जीदजवळ हमजा प्लॉट) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून युवकाचा मोबाइल, सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एक लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Trending